Jump to content

एलिस आयलंड

एलिस आयलंड हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील हडसन नदीच्या मुखाजवळ असलेले बेट आहे. येथे अमेरिकेत येणाऱ्या लाखो परदेशवासीयांचे प्रवेश द्वार म्हणून १८३२ ते १९५४ सालपर्यंत वापरली जाणारी वास्तू आहे. १९९० नंतर त्याचे आगमन करणाऱ्या इतिहासाची आठवण करून देणारे संग्रहालय म्हणून नावारूपाला आले आहे.

इतिहास

एलीस आयलंड - एक विहंगावलोकन

अमेरिकेमध्ये १७ व्या शतकापासून अनेक लोक कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातून आले. त्यामुळे प्रथम पासूनच अमेरिकेच्या स्थानिक नागरिकांना तेथे फारसा थारा दिला गेला नाही. इंग्लिश अमेरिकेची मुख्य भाषा होती. याशिवाय स्पॅनिश व पोर्तुगीजही प्रचलित होत्या. १९ व्या शतकाच्या शेवटी परदेशातून येणाऱ्या लोकांचे लोंढे खूप प्रमाणात वाढले. त्यावर थोडासा अंकुश हवा या साठी १ जाने. १८९२ साली एलिस आयलंड हे परदेशगमन विभाग म्हणून सुरू करण्यात आले. १९५४ सालपर्यंत १ कोटी २० लाख लोकांनी या वास्तूमधून अमेरिकेमध्ये प्रवेश केला. पैकी फक्त १९०७ या एका साली १० लाखापेक्षा जास्त लोकांनी येथून प्रवेश केला. येथून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या लोकांना २७ प्रश्न विचारले जात. आणि जे लोक त्यांना येथे काम करण्यासाठी अयोग्य ठरत त्यांना येथुनच परत पाठवले जात असे. काही जन त्यांचा देश कायमचा सोडून आलेले असत. अमेरिकेत येऊन पुढचे जीवन व्यतित करणे हे एकाच ध्येय त्यांचे असायचे. येताना आजारी पडलेल्या व्यक्तींना येथील दवाखान्यात क्वारंटाइन[मराठी शब्द सुचवा]मध्ये ठेवण्यात येई. अशा ३,००० पेक्षा जास्त व्यक्तींचा येथे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जात. एलिस आयलंडवरील एकूण कार्यवाही बद्दलची एक फिल्म बनवण्यात आली आहे. येणाऱ्या व्यक्तींचे जुने सामान, जुन्या आठवणी, जुनी नाणी, जुने चलन आणि जुन्या गोष्टी तेथील वस्तू संग्रहालयात त्यांनी जपून ठेवले आहे. येथे एका विभागात किती लोक कुठल्या उपखंडातून आले याची माहिती तसेच त्याचे फोटोही लावलेले आहेत.

परदेशगमन विभाग

एक जूने आवाहन

कला क्षेत्रात

एक चलचित्र

एलिस आयलंडचा कला, साहित्य, संगीत आणि चित्रपटांत अनेक ठिकाणी संदर्भ आलेला आहे.

विमानातून काढलेले चित्र
तेथिल संग्रहालय


हे सुद्धा पहा

साचा:Portal box (इंग्लिश मजकूर)

  • एंजेल आयलंड, कॅलिफोर्निया
  • Geography of New York-New Jersey Harbor Estuary
  • हॉफमन आयलंड
  • फिलाडेल्फिया लाझारेटो
  • न्यू यॉर्क व न्यू जर्सी बंदर

संदर्भ आणि बाह्य दुवे

हे संदर्भ इंग्लिश मध्ये आहेत.

साचा:न्यू यॉर्क शहरातील द्वीपे साचा:मॅनहॅटन