Jump to content

एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन

एलिझाबेथ पास्केल हॉइसिंग्टन (३ नोव्हेंबर, १९१८:न्यूटन, कॅन्सस, अमेरिका - २१ ऑगस्ट, २००७:स्प्रिंगफील्ड, व्हर्जिनिया, अमेरिका) या अमेरिकेच्या सैन्यातील जनरलपदी बढती मिळालेल्या दुसऱ्या महिला होत्या.

त्यांनी १९४०मध्ये कॉलेज ऑफ नॉट्र डेम ऑफ मेरिलॅंडमधून पदवी मिळवली. १९४२मध्ये त्या विमेन्स आर्मी ऑक्झिलरी कोरमध्ये दाखल झाल्या. त्यांची तैनात बॅंगोर, मेन येथील विमानी पूर्वसूचना एककात झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी फ्रांसमधील लढायांमध्ये भाग घेतला. ११ जून, १९७० रोजी त्यांना ॲना मे हेस यांच्यासोबत ब्रिगेडियर जनरलपदी बढती देण्यात आली.

कौटुंबिक माहिती

हॉइसिंग्टनचे आजोबा कर्नल पेरी मायलो हॉइसिंग्टन कॅन्सस नॅशनल गार्डच्या संस्थापकांपैकी एक होते तर वडील ग्रेगोरी हॉइसिंग्टन अमेरिकेच्या सैन्यात कर्नल होते. एलिझाबेथचा भाऊ पेरी हॉइसिंग्टन दुसरा हा अमेरिकच्या वायुसेनेतील जनरल होता. एलिझाबेथ आणि पेरी हे अमेरिकेतील भाऊ-बहीण असलेली आणि जनरलपदी कामगिरी केलेली पहिली भावंडे होती.

हे सुद्धा पहा