एलानो
एलानो ब्लुमर (पोर्तुगीज: Elano Blumer; १४ जून १९८१ ) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००४ ते २०११ दरम्यान ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला एलानो २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक, २०१० फिफा विश्वचषक व २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर एलानो २००१-०४ दरम्यान ब्राझीलमधील सान्तोस एफ.सी., २००४-०७ दरम्यान युक्रेनमधील एफ.सी. शख्तार दोनेत्स्क, २००७-०९ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी, २००९-११ दरम्यान तुर्कस्तानमधील गालातसराय एस.के. तर २०१४ पासून भारताच्या इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयिन एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.