एल. अदाईकलराज
एल. अदाईकलराज (मे ९,इ.स. १९३६-हयात) हे भारत देशातील तमिळनाडू राज्यातील राजकारणी आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.