Jump to content

एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२

एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२
अपघात झालेल्या विमानासारखेच एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान (नों.क्र. व्हीटी-एएक्सयू)
अपघात
तारीख मे २२, इ.स. २०१०
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी क्र.२४च्या पुढे
12°56′48″N 074°52′25″E / 12.94667°N 74.87361°E / 12.94667; 74.87361
प्रवासी १६०[][]
कर्मचारी[]
जखमी[]
मृत्यू १५८[]
बचावले
विमान प्रकार बोईंग ७३७-८एचजी
वाहतूक कंपनी एर इंडिया एक्सप्रेस
विमानाचा शेपूटक्रमांकVT-AXV
पासूनदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, संयुक्त अरब अमिराती
शेवट मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारत

एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ या दुबईहुन मंगलोर येथे जाणाऱ्या बोइंग ७३७ या विमानास मंगलोर विमानतळावर उतरताना अपघात झाला. त्यात ६ विमान कर्मचारी व १६० प्रवासी (१०५ माणसे,३२ महिला,१९ मुले व ४ नवजात अर्भके) अश्या एकूण १६६ व्यक्ती होत्या. त्यापैकी फक्त ८ प्रवासी वाचले आहेत. यांपैकी फक्त एक प्रवासी काहीही जखमा न होता वाचला. चालकदलातील सर्व ६ लोकांचे निधन झाले. चालकदलात दोन महिला होत्या.हे विमान सुमारे अडीच वर्षे जुने होते.

घटनाक्रम

या विमानाने दिनांक २२ मे, २०१० रोजी पहाटे ०१.१५ वाजता दुबईहुन उड्डाण केले व सुमारे सकाळी ६.३० वाजता मंगलोर विमानतळावर उतरत असताना त्या विमानास अपघात झाला. धावपट्टीच्या लांबीच्या पुढे जाण्यामुळे विमानास हा अपघात झाला असे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. मंगलोर येथील विमानतळाची धावपट्टी ही 'टेबलटॉप'[मराठी शब्द सुचवा] या प्रकारातील आहे. ही धावपट्टी क्रमांक २४ची धावपट्टी म्हणूनही ओळखली जाते.त्या धावपट्टीची लांबी सुमारे ८,००० फूट (२,४५० मीटर) आहे. त्यापुढे सुमारे ९० मीटर अंतराचे सुरक्षा क्षेत्र आहे.विमान उतरताना धावपट्टीच्या स्पर्शबिंदू(टचपॉईंट)च्या बरेच पुढे उतरल्यामुळे धावपट्टीची लांबी कमी पडली व विमान त्यापुढे निघून गेले असल्याची अटकळ आहे. त्यावेळेस दृष्यता सुमारे ६ कि.मी. होती व वातावरण ठीक होते. अपघातग्रस्त विमानातून या विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघातानंतर सुमारे ७२ तासानंतर मिळाला. धावपट्टीच्या दोन्हीकडे दरी असल्यामुळे बचावकार्यास अडथळा येत आहे. विमानतळ नियंत्रण कक्ष व वैमानिक यांच्यांत झालेल्या संवादादरम्यान,विमानाच्या बाबत काहीच गैर असल्याचा वा कोणताही धोक्याचा संदेश वैमानिकातर्फे देण्यात आलेला नव्हता.

चालकदल

या विमानाचे वैमानिक अनुभवी होते. त्यांना उड्डाणाचा बराच अनुभव होता.

वैमानिकाचे नाव- झेड. ग्लुसिया-वय-५३ वर्षे, सुमारे १०,००० उड्डाणतासांचा अनुभव-मंगलोर विमानतळावर २६ वेळा उतरण्याचा अनुभव.

सहवैमानिकाचे नाव-एच.एस. अहलुवालिया-३७५० तासांचे वर उड्डाणतासांचा अनुभव -मंगलोर विमानतळावर ६६ वेळा उतरण्याचा अनुभव.

अपघातस्थळाचे अक्षांश रेखांश

  • अक्षांश = १२.५६'.५०"
  • रेखांश = ७४.५२'.२८"

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b Mondal, Sudipto. "Air India Express IX-812 accident". 2010-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "List of passengers on Air India Express flight". The Hindu. 22 May 2010. 2010-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2010 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Airliner crashes in south India, 158 dead". 2010-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2010 रोजी पाहिले.