Jump to content

एर इंडिया एक्सप्रेस

एर इंडिया एक्सप्रेस भारतातील केरळमधून स्वस्त दराने विमानसेवा देणारी एर इंडियाला सहाय्यकारी अशी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी पहिली एरलाइन्स आहे.[] तिचे मुख्यालय कोची येथे आहे. या एरलाइन्सकडून मध्य पूर्व आणि द‍‍क्षिण पूर्व आशियामध्ये सेवा दिल्या जात आहेत. एअर इंडिया लि.ला साहाय्यकारी असणाऱ्या एर इंडिया चार्टर लिमिेटेडच्या मालकीची आहे. सध्या प्रत्येक आठवडयाला १०० उडडाणे मुख्यत्वेकरून तामिळनाडूच्या दक्षिण राज्यामधून सुर ु आहेत.

इतिहास

मध्यपूर्व आशियामध्ये स्थायिक झालेल्या मल्याळी समाजातील लोकांच्या स्वस्त विमानसेवेच्या सततच्या मागणीमुळे मे २००४ मध्ये या विमानसेवेची स्थापना झाली. २९ एप्रिल २००५ रोजी तिरुवअंनंतपुरमपासून अबुधाबीपर्यंत पहिले उडडाण या विमानसेवेने केले.[] दि. २२ फेब्रुवारी २००५ रोजी ७३७-८६ क्यू हे बोइंग विमान हे या कंपनीच्या ताफ्यातील पहिले विमान होते.

संयुक्त व्यवस्था

ह्या एरलाइन्सचे मुंबईमधील नरीमन पॉइंट येथील एर इंडिया इमारतीमध्ये मुख्यालय आहे.[] डिसेंबर २०१२ मध्ये एर इंडिया सदस्य समितीने १ जानेवारी २०१३ पासून कंपनीचे मुख्यालय कोचीन येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.[] केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री, के. सी. वेणुगोपाल यांनी १ जानेवारी २०१३ पासून टप्य्याटप्य्याने मुख्यालय कोचीन येथे स्थलांतरित करत असल्याचे जाहीर केले आहे.[] या एरलाइन्सचा अभियांत्रिकी विभाग तिरुवअनंतपुरम येथे स्थलांतरित झालेला आहे. तिरुवअनंतपुरमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एर इंडिया चार्टर लि.च्या या एरलाइन्सच्या बोइंग ७३७-८०० विमानांची देखभाल, दुरुस्ती व इतर सुविधा ( एमआरओ ) प्राप्त करून घेण्यापूर्वी महत्त्वाची असणारी ‘सी’ तपासणी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सी दर्जाची तपासणी होऊ शकणारे त्रिवेंद्रम हे तिसरे शहर आहे. ३००० उड्डाणे किंवा १५ महिने यापैकी जे आधी पूर्ण होईल त्या विमानांसाठी सी दर्जाची तपासणी आवश्यक आहे. अभियंते विमानाच्या उड्डाणाचे नियंत्रण, विमानातील नादुरुस्त भागांची दुरुस्ती व विमानाच्या अंतर्गत व्यवस्थेची चाचणी इ. बाबी नेमून दिलेल्या मोजमापावर सी दर्जाची तपासणी केली जाते. सुरुवातीच्या काळात त्रिवेंद्रममध्ये एका वेळी २ विमानांना आणि आठवड्यात ३ विमानांची संपूर्ण तपासणी या एमआरओ सुविधेमध्ये होते. १६ डिसेंबर २०११ रोजी जवळजवळ ६.०७ हेक्टरमध्ये .११० कोटी रुपये किंमतीची एमआरओ सुविधा पार पाडली जात होती.

ताफा

एर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचा ताफा खालीलप्रमाणे आहे. (जून २0१३ प्रमाणे)

एर इंडिया एक्सप्रेसचा ताफा []
विमान चालू प्रवासी
(इकॉनॉमी)
शेरा
बोइंग ७३७-८०० २१ १८६ ४ विमाने विकून पुन्हा दीर्घ मुदतीसाठी भाडयाने करारबद्ध केली.
एकूण २१
विमानात देण्यात येणारा अल्पोपहार

जानेवारी २०१३ प्रमाणे एर इंडिया एक्सप्रेस विमानाचे सरासरी वयोमान ५.१ वर्ष इतके आहे.

विमानांतर्गत सेवा

स्वस्त दरात सेवा देण्याऱ्या या विमानामध्ये प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अल्पोपहार पुरविण्यात येतो. प्रवाशांसाठी थोडया प्रमाणात मनोरंजनाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

एअर इंडिया एक्सप्रेस विमान बोइंग ७३७-८०० मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर

अपघात आणि दुर्घटना

२२ मे २०१० रोजी एर इंडिया एक्सप्रेस विमान ८१२ बोइंग ७३७-८०० दुबई-मंगलोर मार्गावर मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना अपघात होऊन विमानातील १६६ जणांपैकी १५२ प्रवासी आणि ६ वैमानिक मृत्युमुखी पडले होते.[][][][१०][११] २५ मे २०१० रोजी एर इंडिया एक्सप्रेस बोइंग ७३७-८०० दुबई ते पुणे मार्गावर प्रवास करताना सहवैमानिकाने विमानाचा ताब घेतला असताना अचानक वेगाने ७००० फूट खाली झेपावू लागले. परंतु त्याच वेळी कॉकपिटच्या बाहेर गेलेल्या वैमानिकाने परत कॉकपटमध्ये येऊन विमानाचा ताबा घेतला व पुढचा अनर्थ टाळला होता.[१२][१३][१४]

शेपटीतील कौशल्य

एर इंडियाचा एक्सप्रेसच्या प्रत्येक विमानाच्या शेपटीवर भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास आणि परंपरा यांचा मिलाफ असलेले नक्षीकाम दिसून येते.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "'एअर इंडिया एक्सप्रेसचे मुख्यालय कोची येथे हलवणार'. ३१ डिसेंबर २०१०" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "'ऑन बोर्ड एअर इंडिया एक्स्प्रेस'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "आमच्याशी संपर्क साधा". एअर इंडिया एक्सप्रेस. मुख्यालय : एअर इंडिया एक्सप्रेस – इंडिया इमारत, नरीमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१, भारत’. ५ फेब्रुवारी २०१३
  4. ^ "एअर इंडिया एक्सप्रेसचे मुख्यालय कोचीन येथे स्थलांतर करण्यास मान्यता Archived 2013-06-15 at the Wayback Machine.". टाइम्स ऑफ इंडिया. १४ डिसेंबर २०१२. ५ फेब्रुवारी २०१३.
  5. ^ "एअर इंडिया एक्सप्रेसचा मार्ग लवकरच शहरातून सुरू". द हिंदू. ७ जानेवारी २०१३. ५ फेब्रुवारी २०१३ .
  6. ^ एआयएक्स संबंधी"
  7. ^ "'भारतामध्ये जेट कोसळून १५८ मुत्युमुखी , ८ बचावले'" (इंग्लिश भाषेत). 2010-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "'मंगलोर मध्ये जेट विमान अपघातात १५८ मुत्युमुखी'" (इंग्लिश भाषेत). 2013-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "'भारतामध्ये दुबईमधून निघालेले एअर इं‍डियाचे विमान कोसळले'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "'एअर इंडियामध्ये घबराट'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "'मंगलोरमध्ये विमान कोसळून १६० जण ठार'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ "'अहवाल : सहवैमानिकाची गंभीर चूक'" (इंग्लिश भाषेत). 2015-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "'एअर इंडियामधील घाबरलेल्या सहवैमानिकाकडून विमान खोल गर्तेत'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ "'भित्रट सहवैमानिकामुळे विमानातील भारतीय प्रवासांच्या हवेत गटांगळया'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)