एर इंक
उद्योग क्षेत्र | वैज्ञानिक साहित्य, औद्योगिक शाई |
---|---|
स्थापना | २०१६ |
संस्थापक | एमआयटी मीडिया लॅब |
मुख्यालय | बोस्टन, अमेरिका |
महत्त्वाच्या व्यक्ती | अनिरुद्ध शर्मा, निखिल कौशिक, निषिद सिंह, नितेश कादान [१] |
उत्पादने | 'काल इंक,' पेन, औद्योगिक शाई, स्प्रे पेंट, मार्कर |
संकेतस्थळ | www |
एर-इंक ही शाई जीवाश्म इंधनांच्या (पेट्रोल, डिझेल, ईतर) अपूर्ण ज्वलनामुळे हवेत तयार झालेले कार्बन-आधारित वायूप्रवाहांचे संक्षेपण करून बनवली जाते. तसेच याच त्तत्त्वावर आधारित इतर कंपोझिट उत्पादन करणारा ब्रँड आहे.[२] याची स्थापना ग्रॅविकी लॅब्ज या एमआयटी मीडिया लॅब कंपनीच्या स्पिन-ऑफ ग्रुपने केली आहे. ही पद्धत हवेतील कार्बन गोळा करणे, कार्बन उत्सर्जनापासून वेगळे करणे आणि नंतर हे कार्बन विविध तेल आणि द्राव यांसमवेत मिसळणे अशा प्रक्रियेने बनलेली आहे. प्रगत साहित्याचा गुणधर्म साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणि द्राव वापरतात. मिश्रणाच्या शुद्धीकरणासाठी पेटंट केलेले डिव्हाइस आणि तंत्राचा वापर करतात. या प्रक्रियेला काल-इंक असे नाव आहे. यात कार्बन आणि इतर प्रदूषण करणारे एजंट्स (ज्यात भारी धातू आणि पॉलिसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन) हवेतून वेगळे केले जातात.
वायू प्रदूषण आणि त्याच्यामुळे होणारे मानवी जीवनावरील नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठीचा उपाय म्हणून एर-इंकची जाहीरात केली जाते. याचा वापर केल्यास मुद्रण उद्योगाला कार्बन ऑफसेट करण्याची परवानगी दिली गेली. "पुनर्नवीनीकरणित वायू प्रदूषणापासून बनविलेली पहिली शाई" म्हणून हिला गौरवण्यात आले. डब म्हणून वापरण्यात येणारी उत्पादने जून २०१६ मध्ये हाईनकेन यांच्या संयुक्त विद्यमाने हाँगकाँगच्या शेंग वॅन जिल्ह्यात पथ कला आणि म्युरल्स तयार करण्यासाठी ही शाई वापरली गेली.[३] ३० ते ५० मिनिटांच्या कार प्रदूषणापासून एक एर-इंक पेन भरण्यापुरती शाई बनु शकते.
संदर्भ
- ^ "air-ink home page".
- ^ "Pollution ink". Dwell (2): 34. 2019.
- ^ "Kaalink".[permanent dead link]