Jump to content

एम.ओ.एच. फारूक

एम.ओ. हसन फारूक

केरळचे राज्यपाल
कार्यकाळ
८ सप्टेंबर २०११ – २६ जानेवारी २०१२
मागील रामकृष्ण सूर्यभान गवई
पुढील हंसराज भारद्वाज

झारखंडचे राज्यपाल
कार्यकाळ
२२ जानेवारी २०१० – ४ सप्टेंबर २०११
मागील के. शंकरनारायणन
पुढील सय्यद अहमद

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१९९१ – १९९८
मागील पी. शण्मुगम
पुढील एस. अरूमुगम
मतदारसंघ पुडुचेरी
कार्यकाळ
१९९९ – २००४
मागील एस. अरूमुगम
पुढील एस. रामदास

पुडुचेरीचे मुख्यमंत्री
कार्यकाळ
१६ मे १९८५ – २१ जानेवारी १९८९
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ६ सप्टेंबर १९३७ (1937-09-06)
पॉंडिचेरी
मृत्यू २६ जानेवारी, २०१२ (वय ७४)
चेन्नई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म मुस्लिम

एम.ओ. हसन फारूक मरिकार (तामिळ: எம்.ஓ.எச் ஃபரூக் மரைக்காயர், मल्याळम: എം.ഒ. ഹസൻ ഫാറൂഖ് മരിക്കാർ; ६ सप्टेंबर १९३७ - २६ जानेवारी २०१२) हे भारत देशातील केरळझारखंड राज्यांचे माजी राज्यपाल, लोकसभा सदस्य व तीन वेळा पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते.

१९६७ साली पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदावर आलेले फारूक तेथील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. १९६७-१९६८, १९६९-१९७४ व १९८५-१९८९ ह्या तीन वेळा ते ह्या पदावर होते. १९९१, १९९६ व १९९९ साली ते पुडुचेरीमधून लोकसभेवर निवडून आले होते.

केरळच्या राज्यपालपदावर असताना २६ जानेवारी २०१२ रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.

बाह्य दुवे