Jump to content

एप्रिल ५

एप्रिल ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९५ वा किंवा लीप वर्षात ९६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६६३ - दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’’जिवावरचे बोटावर निभावले’’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.
  • १६७९ - छत्रपती राजाराम यांना पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरून प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर छत्रपती राजाराम यांना पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]

अठरावे शतक

  • १७९४ - फ्रेंच राज्यक्रांती-क्रांतीचा एक नेता जॉर्ज दॉंतों यावर सरकार उलथवण्याच्या कटाचा आरोप ठेवून त्याचा गिलोटीनवर शिरच्छेद.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९२२ - अमेरिकन बर्थ कंट्रोल लीग (पुढे प्लॅन्ड पेरेंटहूड)ची सुरुवात.
  • १९३० - २४१ मैल प्रवास करून महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
  • १९४९ - भारतात स्काऊट, गाईडची स्थापना.
  • १९५७ - भारतात कम्युनिस्टांचा राज्यस्तरावर प्रथम विजय, केरळ विधानसभेत बहुमत आणि इ.एम.एस. नंबुद्रीपाद मुख्यमंत्रीपदी.
  • १९७९ - भारतातल्या पहिल्या नाविक वस्तुसंग्रहालयाचे मुंबईत उद्घाटन

एकविसावे शतक

  • २००० - अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी.डी.- ० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • २००० - जळगाव नगरपालिकेच्या १७ मजली इमारतीचे उद्घाटन.
  • २०१३ - ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.

जन्म

मृत्यू

  • १९१७ - स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम.
  • १९२२ - पंडिता रमाबाई, आर्य महिला समाजच्या संस्थापिका.
  • १९४० - चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज, इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते.
  • १९९३ - दिव्या भारती, हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपट अभिनेत्री.
  • १९९६ - भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन, बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक,
  • १९९८ - रुही बेर्डे, मराठीचित्रपट व नाट्य अभिनेत्री.
  • २००२ - मनोहर राजाराम तथा मनू छाब्रिया, दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक.
  • २००७ - लीला मजुमदार, मराठी लेखिका.
  • २००७ - पूर्णचंद्र तेजस्वी, साहित्यिक, लेखन, छायाचित्रकार, चित्रकार, पर्यावरणवादी.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय नौकानयन दिन
  • राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस

बाह्य दुवे

एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - (एप्रिल महिना)