Jump to content

एपितास्यो लिंदोल्फो दा सिल्वा पेसोआ

एपितास्यो लिंदोल्फो दा सिल्वा पेसोआ

एपितास्यो लिंदोल्फो दा सिल्वा पेसोआ (ब्राझिलियन पोर्तुगीज: Epitácio Lindolfo da Silva Pessoa ;) (मे २३, इ.स. १८६५ - फेब्रुवारी १३, इ.स. १९४२) हा ब्राझिलियन राजकारणी व कायदेतज्ज्ञ होता. इ.स. १९१८ साली ब्राझिलियन प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस अल्वेस याला प्रकृतिअस्वास्थ्यामुळे शपथग्रहण करू न शकल्यामुळे अध्यक्ष बनण्याची संधी मिळालेल्या पेसोआने इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ सालांदरम्यान पदारूढ होता. त्याच्या राजवटीत अनेकवार सैनिकी बंडाळ्या घडून आल्या व त्यांची परिणती पुढे इ.स. १९३० सालातली ब्राझिलियन क्रांती घडून येण्यात झाली.

बाह्य दुवे