एन. शिवराज
राव बहादूर नामासीवयाम शिवराज (२९ सप्टेंबर १८९२ - २९ सप्टेंबर १९६४) हे तमिळनाडू राज्यातील एक भारतीय वकील, राजकारणी आणि पेरीयार कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारित वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते. १९५७ ते १९६१ पर्यंत त्यांनी लोकसभा सदस्य म्हणून चेनलपट्टू म्हणून काम केले. आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "भारतीय रिपब्लिकन पक्ष" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. आणि एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[१]