Jump to content

एडनचे आखात

एडनचे आखात

एडनचे आखात हे अरबी समुद्राचे एक आखात आहे. हे आखात उत्तरेकडील अरबी द्वीपकल्पावरील येमेनला आफ्रिकेच्या शिंगामधील सोमालिया देशापासून वेगळे करते. वायव्येला बाब-अल-मांदेब ही सामुद्रधुनी ह्या आखाताला लाल समुद्रासोबत जोडते. ह्या आखाताचे नाव येमेनमधील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या एडन ह्या शहरावरून पडले आहे.

सुएझ कालव्यामधून भूमध्य समुद्रअरबी समुद्रादरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलवाहतूकमार्गाचा एडनचे आखात हा महत्त्वाचा भाग आहे. येथून दरवर्षी सुमारे २१,००० जहाजे जातात. सोमालियामध्ये आश्रय घेतलेल्या सागरी चांचांद्वारे अनेक मालवाहू जहाजांचे खंडणीसाठी होणारे अपहरण ह्यासाठी एडनच्या आखातामधील जलमार्ग धोकादायक बनला आहे. सोमालियामध्ये संपूर्ण अराजक असल्यामुळे ह्या चाचांवर कारवाई करणे अशक्य होते. ह्यासाठी अनेक देशांनी आपली लढाऊ जहाजे ह्या भागात तैनात केली आहेत. ह्या आखाताद्वारे भारत दरवर्षी ६० अब्ज डॉलर किंमतीच्या मालाची निर्यात तर ५० अब्जांची आयात करतो. ह्या दृष्टीने ह्या जलमार्गाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौसेना येथे कायमस्वरूपी गस्त ठेवते.