Jump to content

एचएमएस बुलडॉग

एचएमएस बुलडॉग नावाची रॉयल नेव्हीची सात जहाजे आत्तापर्यंत झालेली आहेत आणि आठवे जहाज निर्माणाधीन आहे.:

  • एचएमएस बुलडॉग (१७९४) - १७९४मध्ये विकत घेतलेले ४ तोफी मालवाहू जहाज.
  • एचएमएस बुल डॉग (१७८२) - १६ तोफी युद्धनौका. १७९८ मध्ये या नौकेचे बॉम्बफेकी जहाजात रुपांतर केले गेले. हे जहाज नकळत फेब्रुवारी १८०१मध्ये फ्रेंच ताब्यात असलेल्या अँकोना बंदरात गेले व पकडले गेले. काही महिन्यांनी ब्रिटिशांनी हे पुन्हा ताब्यात घेतले परंतु वाऱ्यामुळे तिला निसटता आले नाही फ्रेंचांनी तिला पुन्हा ताब्यात घेतले. सप्टेंबरमध्ये शेवटी एचएमएस चॅम्पियनने गॅलीपोली, अपुलिया येथे सुटका केली. [] बुलडॉग पोर्ट्समथला परतल्यावर या नौकेला तोफांची सामग्री पुरवण्याऱ्या जहाजात परिवर्तित केले गेले. अंततः डिसेंबर १८२९ मध्ये पोर्ट्समाउथ या नौकेला मोडीत काढले गेले. []
  • एचएमएस बुलडॉग (१८४५) - ही वाफेवर चालणारी लाकडी युद्धनौका होती. तिने १८४८ मध्ये पालेर्मोमधील बंडखोरांवर नेपोलिटन नौदलाचा गोळीबार थांबविला. [] हैतीमधील ब्रिटिश वाणिज्य दूतावास ताब्यात घेतलेल्या सरकारविरोधी बंडखोरांविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हैतीच्या किनारपट्टीवर असताना ती १८६५ मध्ये जमिनीवर अडकली. नौकेची सुटका न करता आल्यामुळे तिच्या खलाशांनी तिचा नाश केला.
  • एचएमएस बुलडॉग (१८७२) - ही अँट वर्गाची तिसऱ्या वर्गाची गनबोट होती. हिला १९०६मध्ये मोडीत काढले गेले.
  • एचएमस बुलडॉग (१९०९) - बीगल वर्गाची विनाशिका. १९२०मध्ये मोडीत.
  • एचएमएस बुलडॉग (एच९१) - या १९३०मध्ये जलावतरित विनाशिकेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान संपूर्णावस्थेतील एनिग्मा यंत्र पकडले होते. याने नाझी जर्मनीच्या गुप्त खबरी मिळवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले.
  • एचएमस बुलडॉग (ए३१७) - १९६७मध्ये जलावतरित बुलडॉग वर्गीय सर्वेक्षण नौकांमधील पहिली नौका. २००१मध्ये हिचे खाजगी बोटीत रुपांतरण झाले.
  • एचएमएस बुलडॉग - ही ३१ प्रकारची फ्रिगेट निर्माणाधीन आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "क्र. 15426". द लंडन गॅझेट. 10 November 1801. p. 1356.
  2. ^ Winfield and Roberts (2015), p. 175.
  3. ^ Alessia Facineroso The Sicilian Revolution of 1848 as seen from Malta[permanent dead link]