Jump to content

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स पदवी

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स (इ. एम. ) किंवा मास्टर ऑफ एडव्हान्स स्टडीज(एम. ए. एस. ) ही एक मिड-कारकीर्द व्यावसायिक कार्यकारींसाठी बनवलेली उच्चस्तरीय पदव्युत्तर पदवी आहे. त्याच्या काही पदवी एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ आर्टस्, एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स किंवा काही पदवी एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन , एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन किंवा एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ एडव्हान्स स्टडीज इन ह्युमॅनिटिरीअन लॉजिस्टिक्स आणि मॅनेजमेंट (एम. ए. एस. एच. एल. एम.) या आहेत.

रचना

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ह्या अभ्यासक्रमांसाठी सहसा पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्या नोकरदारांकडून नोंदणी केली जाते म्हणून हा कार्यक्रम ही नोकरीची अट मान्य होईल असा बनविलेला असतो. बरेचसे एक्झिक्युटिव्ह मास्टर्स कार्यक्रम महिन्यातील काही दिवस असतात ( पण ते एका आठवड्यापेक्षा जास्त नसतात.) आणि त्याचा कालावधी २-३ वर्षांचा असतो. [][] याचप्रकारे काही वर्ग रात्री आणि शनिवार - रविवार आयोजलेले असतात. असे कार्यक्रमकमीत कमी वर्षांमध्ये पूर्ण केले जाऊ शकतात. बोलोग्ना प्रणाली नुसार या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांना ही पदवी मिळविण्यासाठी ६० इ.सी.टी. असणे गरजेचे असते. बाकी प्रणालींमध्ये या कार्यक्रमाचा कालावधी हा एकूण शैक्षणिक क्रेडिट आणि एका सेमिस्टर मध्ये पूर्ण होणाऱ्या कोर्स क्रेडिट वर अवलंबून असतो.

प्रकार

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स इन कम्युनिकेशन :

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स इन कम्युनिकेशन हे पुरेसा अनुभव असलेल्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन नोकरदारांसाठी योजलेला आहे. इ.एम.एस.कॉम कार्यक्रम हा इ.एम.बी.ए.च्या स्तरावरचा असून त्यात कमी सत्र असतात. आणि तो आवश्यक वर्षांमध्ये वितरित केलेला असतो. ( उदाहरणार्थ २ वर्षांच्या कालावधीत दर २ महिन्यांमध्ये ७ दिवसांचे सत्र असते.) अभ्यासक्रम: एक तृतीयांश कार्यक्रमात सामान्यपणे इ.एम.बी.ए. मध्ये असतात त्याप्रमाणे व्यवस्थापनाचे विषय असतात. आणि उरलेल्या दोन तृतीयांश विषय कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या संबंधित असतात.

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स इन मार्केटींग आणि सेल्स :

एस.डी.ए. बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट मधील बोकोनी विद्यापीठ (मिलान, इटली) आणि इ.एस.ए.डी.इ. बिझनेस स्कूल (बार्सिलोना, स्पेन) मार्केटिंग ऍण्ड सेल्स मध्ये एक संयुक्त कार्यकारी पदव्युत्तर पदवी देते. एक्झिक्युटिव्ह मास्टर्स इन मार्केटींग आणि सेल्स (इ.एम.एम.एस.) हा मार्केटींग आणि सेल्सचा पुरेसा अनुभव असलेल्या आणि ज्यांना स्वतःचे कौशल्य वाढवायचे असते त्यांच्यासाठी योजलेले असतो. इ.एम.एम.एस. हा इ.एम.बी.ए.च्या स्तरावरील कार्यक्रम असून त्यात १४ महिन्यात ७ कठीण विभाग असतात (प्रत्येक विभागासाठी ७ दिवस असतात.)

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स इन हेल्थ सिस्टिम

बिंघमटन विद्यापीठामध्ये एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स इन हेल्थ सिस्टिम हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम २ प्रकारांत विभागलेला असतो : मास्टर ऑफ सायन्स इन इंडस्ट्रियल ऍण्ड सिस्टिम इंजिनीरिंग (आय.एस.इ .) विथ हेल्थ सिस्टिम कॉन्सन्ट्रेशन; मास्टर ऑफ सायन्स इन सिस्टिम सायन्स (एस.एस.) विथ हेल्थ सिस्टिम कॉन्सन्ट्रेश.

आय.एस.इ. पदवी मिळविण्यासाठी इंजिनीरिंगची पदवी असणे गरजेचे असते. तर एस.एस. पदवी कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना प्राप्त करता येते.

प्रवेश

एक्झिक्युटिव्ह मास्टर्सला प्रवेश घेण्यासाठी अर्जदारामध्ये खालीलबाबी असणे गरजेचे असते :

  • पदवी
  • स्वतःच्या अभ्यासाच्या क्षेत्रातील ४-१५ वर्षांचा कामाचा अनुभव (किंवा तुलनात्मक पार्श्वभूमी आणि विशिष्ट विषयाची आवड)
  • नेतृत्व करण्याची क्षमता

प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी प्रत्येक देशासाठी वेगळ्या असू शकतात.[] काही विद्यापीठांसाठी जी.मॅट, जी.आर.इ. किंवा इतर गणिती परीक्षांचे गुण गरजेचे असतात.[]

पदवीच्या आवश्यकता:

पदवीसाठी ब्लॉगना प्रक्रियेतील ६० इ.सी.टी. असणे गरजेचे असते. युनायटेड स्टेट्स मधील कार्यक्रमासाठी यू .एस. डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशननुसार ३३ गुण आवश्यक असतात.[] हे गुण प्रत्येक प्रत्येक क्रेडिट सिस्टम नुसार वेगळे वेगळे असू शकतात. या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सभासदाने थेसिस किंवा प्रॉजेक्ट पूर्ण करणे गरजेचे असते ज्यावर त्यांनी ३५०-५०० तास काम केलेले हवे.[]

संदर्भ

  1. ^ बॉलोग्ना प्रोसेस: स्विस नॅशनल रिपोर्ट २००७ -२००८
  2. ^ "एक्झिक्युटिव्ह मास्टर्स". 2017-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ इंटरव्हिएव विथ द हेड ऑफ यू एस आय एक्सएकटीव्ह मास्टर ऑफ सायन्स इन कोम्मुनिकेशन प्रोग्रॅम
  4. ^ "अझूस पॅसिफिक युनिव्हर्सिटी ऍडमिशन आवश्यकता". २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "यू.एस. डिपार्टमेंट ऑफ एडुकेशन". २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ इंटरव्हिएव विथ द हेड ऑफ यू एस आय एम्सकॉम प्रोग्रॅम