एका लग्नाची तिसरी गोष्ट
एका लग्नाची तिसरी गोष्ट | |
---|---|
दिग्दर्शक | विनोद लव्हेकर |
कथा | श्रीरंग गोडबोले |
कलाकार | खाली पहा |
शीर्षकगीत | संदीप खरे |
संगीतकार | सलील कुलकर्णी |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
अधिक माहिती | |
आधी | जुळून येती रेशीमगाठी |
नंतर | फू बाई फू / अस्मिता |
सारखे कार्यक्रम | एका लग्नाची दुसरी गोष्ट |
एका लग्नाची तिसरी गोष्ट ही झी मराठी वरील प्रसारित झालेली एक मालिका आहे. यात उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांनी अभिनय केला आहे. याआधी याच वाहिनीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका प्रसारित झाली होती. त्या अनुषंगाने या मालिकेचे नाव एका लग्नाची तिसरी गोष्ट असे होते. या मालिकेची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांनी इंडियन मॅजिक आय या निर्मिती संस्थेद्वारा केली होती. २०१५ मध्ये ही मालिका मिले सूर मेरा तुम्हारा या नावाने हिंदीमध्ये डब करून झी टीव्ही वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती.
कथानक
ही मालिका ओम चौधरी (उमेश कामत) व ईशा देशमुख (स्पृहा जोशी) या दोन वकिलांची प्रेमकथा आहे. ईशा ही एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. तर ओम हा त्याच्या आई-वडिलांचा लहानपणीच घटस्फोट झाल्याने वसतिगृहात वाढलेला मुलगा आहे. मात्र योगायोगाने काही माणसं त्यांच्या आयुष्यात येतात व तो त्यांना त्यांच्या घरात सामावून घेतो. त्यांचे एक अनौपचारिक कुटुंब तयार होते. मात्र ईशा-ओमच्या लग्नासाठी ईशाच्या आजोबांची अट असते की ओमचे सख्खे नातेवाईक एकत्र यायला हवेत. मानलेली नाती असलेल्या कुटुंबामध्ये ईशाचे लग्न होणार नाही. तेव्हा ईशा ओमच्या खऱ्या नातेवाईकांना एकत्र आणण्याचे आव्हान स्वीकारते. त्यात ती यशस्वी होते की नाही याचीच गोष्ट म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका आहे.
कलाकार
- उमेश कामत – ओम चौधरी
- स्पृहा जोशी – ईशा देशमुख
- मोहन जोशी – दत्ताराम
- शुभांगी गोखले – शोभना
- शुभा खोटे – प्रमिला देसाई
- आरती वडगबाळकर – मधू
- सागर तळाशीकर – रणजित चौधरी
- संदेश कुलकर्णी – जयेश
- स्नेहा माजगावकर – धनश्री
- रमेश मेढेकर – कामत आजोबा
- तुषार दळवी – अजित चौधरी
- शिल्पा तुळसकर – ओमची आई
- मिलिंद फाटक – उल्हास प्रधान
- सुनील अभ्यंकर – श्रीकांत ब्रह्मे
- मोहन आगाशे – ईशाचे आजोबा
- अनिता दाते-केळकर – अश्विनी केतकर
- अजित केळकर – ईशाचे बाबा
- उमा सरदेशमुख – ईशाची आई
- सुदीप मोडक - सागर
बाह्य दुवे
रात्री ९च्या मालिका |
---|
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा |