Jump to content

एकनाथ आव्हाड

एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३१ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. कथाकथनाचे ५०० हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा 'महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार' सरांना सन्मानित करण्यात आले आहे. 'कथाकथन तंत्र आणि मंत्र' ही कथाकथनाची कार्यशाळा त्यांनी अनेक ठिकाणी घेतलेली आहे. आव्हाड यांची एकूण ३२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची फुले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद, पाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रह, आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा, आपले सण आपली संस्कृती हे बालकथासंग्रह, मजेदार कोडी, आलं का ध्यानात?,खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रह, मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह, मिसाईल मॅन हे चरित्र... ही त्यांच्या काही पुस्तकांची ठळक नावे. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांत आणि ब्रेल लीपीत अनुवाद झालेले आहेत. आव्हाड सरांची इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'चांदोबाच्या देशात' ही कविता आणि इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'बाबांचं पत्र' हा धडा तसेच इयत्ता पहिली बालभारतीच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात 'शेतकरीदादा ' ही कविता... इत्यादी साहित्य महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठात आव्हाड यांचा 'आनंदाची बाग' हा बालकथासंग्रह एम.ए. मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या 'गंमत गाणी' या जोडाक्षर विरहित बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२००८ साली), 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा बालकवी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (२०२०साली) प्राप्त झाला आहे तसेच महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार (२००८ साली) महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६ साली) त्यांना मिळाले आहेत. यांसह इतरही नामांकित साहित्य व शैक्षणिक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भारत सरकारचा अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०२३ साली त्यांना प्राप्त झाला आहे. आतापर्यंत ८ राज्यस्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले असून आव्हाड यांच्या एकूण बालसाहित्यावर पाच विद्यार्थी पीएच. डी. चा अभ्यास करीत आहेत.

प्रकाशित साहित्य

एकनाथ आव्हाड यांचे प्रकाशित साहित्य

बालकवितासंग्रह

अक्षरांची फुले      

आभाळाचा फळा

खरंच सांगतो दोस्तांनो

गंमतगाणी     

तळ्यातला खेळ

पंख पाखरांचे

बोधाई

मज्जाच मज्जा     

हसरे घर 

सवंगडी

मजेदार गाणी

आनंद झुला

शब्दांची नवलाई

छंद देई आनंद

पाऊस पाणी हिरवी गाणी

काव्यकोडी संग्रह

मजेदार जोडी

मजेदार कोडी - भाग १ व २

आलं का ध्यानात?

खेळ आला रंगात

बालकथासंग्रह

आनंदाची बाग

एकदा काय झालं 

जरा ऐकून तर घ्या

थेंबे थेंबे तळे साचे

निष्फळ भांडण         

राजा झाला जंगलाचा

खळाळता अवखळ झरा  

प्रकाशाचा उत्सव   

आपले सण आपली संस्कृती

नाट्यछटा संग्रह

मला उंच उडू दे

चरित्र

मिसाईल मॅन : डाॅ ए.पी.जे.अब्दुल कलाम (भाग - १ ते ४ )

काव्यसंग्रह

नव्याने बहरावे

एकनाथ आव्हाड यांच्यावर वा त्यांच्या साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके*


  • एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता : स्वरूप आणि शोध (लेखक - सदानंद पुंडपाळ)
  • एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यः बालसमीक्षकांच्या नजरेतून ( संपादन - डाॅ.सुरेश सावंत , डाॅ.मथु सावंत )
  • शब्दांची नवलाई: आकलन आणि आस्वाद ( संपादक -प्रा. डॉ. नरेंद्र पाठक)
  • दापूर ते दिल्ली ( साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांचा साहित्यप्रवास ) संपादक - ज्योती कपिले

बालसाहित्यातील योगदान

*संपादन*

'चैत्रेय' या विशेषांकातील बालविभागाचे अनेक वर्षे  संपादक म्हणून कार्यरत.

*ब्रेल आवृत्ती*

सात पुस्तकांच्या ब्रेल लीपीतील आवृत्त्या प्रकाशित.

*अनुवाद*

अनेक पुस्तकांचे हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद प्रकाशित.

*बालकोश खंड १ ते ५*

पाच बालकथा व पाच बालकवितांचा खंडात समावेश.

*बालगीत लेखन*

आकाशवाणीवरून अनेक बालगीते प्रसारित.

*पाठ्यपुस्तक मंडळ*

४थी व ८वीच्या बालभारती स्वाध्याय पुस्तकांच्या लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य म्हणूनही  कार्यरत होते.

*अभ्यासक्रम समावेश*

मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या संगीत कला अकादमीच्या संगीत अभ्यासक्रमात ४ बालगीतांचा समावेश .

इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'बाबांचं पत्र' या पाठाचा समावेश.

इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'चांदोबाच्या देशात' या बालकवितेचा समावेश.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमराठी भाषिकांसाठी असलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमात पाच बालकवितांचा समावेश.

साहित्य अकादमी*

साहित्य अकादमीच्या बालसाहित्य विषयावरील चर्चासत्रासाठी निमंत्रित.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद या सत्रांत सहभाग

सदरलेखन

तरुण भारत, सकाळ, लोकमत, सामना, प्रहार, नवशक्ति सकाळ साप्ताहिक, प्रभात आदि वृतपत्रांतून मुलांसाठी सदर लेखन.

कथाकथन

एकनाथ आव्हाडांनी कथाकथनाचे ५००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. 'कथाकथन : तंत्र आणि मंत्र' या कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.

एकनाथ आव्हाड यांना मिळालेले सन्मान

  • मुंबईतील चेंबूर येथील सुभाषनगर एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेत शाळा समितीचे अध्यक्षपद
  • मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्यत्व.  

अन्य सन्मान व पुरस्कार

*सन्मान व पुरस्कार*

भारत सरकारचा साहित्य अकादमी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार छंद देई आनंद या बालकवितासंग्रहास (सन २०२३)

☆ महाराष्ट्र शासनाचा वा.गो. मायदेव राज्य पुरस्कार(२००९)

☆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.वि. बोकील राज्यस्तरीय पुरस्कार (पुणे)(२०११)

☆ बुलढाण्याचा शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार(२०१०)

☆ कोल्हापूरच्या बालकुमार साहित्य सभेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार(२०१०)

☆ मुंबईच्या साहित्य दरवळ मंच या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार(२००९ , २०१०)

☆ इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार (२०१४)

☆ बुलढाणा जिल्हयातील मोताळा येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार (२०१५)

☆ अकोल्याच्या अंकुर साहित्य संस्थेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार(२०१५)

☆ मुंबईच्या भारतीय शिक्षण मासिकाचा बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१५)

☆ पुण्याच्या लळीत रंगभूमी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार(२०१४)

☆ यशवंतराव दाते उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (वर्धा) (२०१६)

☆ सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार. (अमरावती)( २०१६)

☆ महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टीमित्र पुरस्कार (२०१३)

☆ कवितेस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक)चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (२०१५)

☆ कवितेस अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (पुणे)(२०११)

☆ महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६)

☆ मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार (२००८)

☆ मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०१६)

☆ प्रा. चंद्रकांत नलगे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय  पुरस्कार (कोल्हापूर) २०१७ 

☆ पद्मगंधा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.(नागपूर) (२०१७)

☆ गंगामाई वाचन मंदिर, आजरा (कोल्हापूर जिल्हा)चा 'ऋग्वेद' - उत्कृष्ट राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (२०१७)

* अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार, वर्धा (२००८)

* मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेचा उत्कृष्ट बालवाङमय श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्कार(२०१९)

* अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेचा उत्कृष्ट चरित्र बालवाङमय स.गो.देसाई  राज्यस्तरीय पुरस्कार(२०१९)

* सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट बालवाङमय पुरस्कार(२०१९)

* महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर, जि. नाशिकचा उत्कृष्ट बालवाङमय राज्यस्तरीय पुरस्कार(२०१९)

* श्रीगुरुदेव सेवाश्रम अमरावतीचा सुदाम सावरकर स्मृती उत्कृष्ट बालवाङमय राज्यस्तरीय पुरस्कार(२०१९)

* सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूरचा सृजनप्रतिभा उत्कृष्ट बालवाङमय राज्यस्तरीय पुरस्कार(२०१९)

* मुंबईच्या दत्ता आयरे स्मारक समितीकडून "दत्ता आयरे  राज्यस्तरीय पुरस्कार" (२००८)

* साहित्य विहार संस्था, नागपूरचा उत्कृष्ट कुमार साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०२१)

* ए.पी.रेंदाळकर वाचनालय, कोल्हापूरचा उत्कर्ष बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०२१)

* आखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय  उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार(२०२१)

* सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर या संस्थेचा विमलबाई देशमुख स्मृती सूर्यांश राज्यस्तरीय पुरस्कार(२०२१)

* साहित्यकणा फाउंडेशन नाशिकचा  डाॅ.राहुल पाटील स्मृती उत्कृष्ट(२०२२) बालसाहित्य राज्यस्तरीय  पुरस्कार

* महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार. (२०२२)

* प्रसाद बन उत्कृष्ट बालसाहित्य  राज्यस्तरीय पुरस्कार (२०२२)

* आदर्श ग्रामपंचायत कार्यालय, घाटकुळ ,जि.चंद्रपूरचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०२२)

*आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी  चा मराठी साहित्यातील सन २०२२ मधील पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती राज्यस्तरीय पुरस्कार.

*महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखा, मंगळवेढ्याचा इंदुमती शिर्के उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय  पुरस्कार २०२२

*नांदेड येथील मातोश्री केवळबाई मिरेवाड उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२२

*बालसाहित्य सेवा पुरस्कार*

* बालसाहित्य कार्यासाठी जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘श्री. दलुभाई जैन प्रायोजित सूर्योदय बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१६)

तसेच याच संस्थेचा सूर्योदय बालमित्र पुरस्कार(२०१९)

* महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचा श्रीनिवास रायते बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०१७)

* मातोश्री लक्ष्मीबाई केदार बालसाहित्य गौरव पुरस्कार(उदगीर)(२०१७)

* मातोश्री स्नेहप्रभा तौर स्मृती बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार (बुलढाणा) (२०१८)


बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्ष*  

* मुंबई महापालिकेच्या शाळांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष(२०१६)

* जळगाव येथे संपन्न दलुभाई जैन प्रायोजित बाराव्या बालसाहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष(२०१६)

* अ.भा. बालकुमार साहित्य संमेलन, परभणी येथे आयोजित विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष(२०१९)

* पाणिनी फाऊंडेशन व स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर  यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष(२०१९)

बांदा नवभारत विद्यालय सावंतवाडीच्या वतीने आयोजित १९ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष(२०१९)

*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सहभाग*

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता, कथाकथन, बालसाहित्य चर्चासत्रे यांत सहभाग.

एकनाथ आव्हाड यांच्यावर वा त्यांच्या साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके

एकनाथ आव्हाड  यांच्या साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके*

* एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता : स्वरूप आणि शोध (लेखक - सदानंद पुंडपाळ)

* एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यः बालसमीक्षकांच्या नजरेतून ( संपादन - डाॅ.सुरेश सावंत , डाॅ.मथु सावंत)