Jump to content

ए.के. हंगल

ए.के. हंगल
ए.के. हंगल
जन्मअवतार किशन हंगल
१ फेब्रुवारी इ.स. १९१७
सियालकोट, पाकिस्तान
मृत्यू २६ ऑगस्ट इ.स. २०१२
आशा पारेख रुग्णालय, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळइ.स. १९६५-इ.स. २००५
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट नमक हराम, शोले, शौकीन, आइना
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कलर्स या वाहिनीवरील "'मधुबाला
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार(इ.स. २००६)
वडील किशन
अपत्ये विजय हंगल

अवतार किशन हंगल ( इ.स. १९१५ - ऑगस्ट २६, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते होते. हंगल यांना २००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नमक हराम', 'शोले', 'शौकीन', 'आइना' असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली, त्यांनी कलर्स या वाहिनीवरील मधुबाला या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यांना त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी पद्मभूषण या सन्मानानी गौरवण्यात आले होते . स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. पाकिस्तानात दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १९४९ साली ते मुंबईत आले. हौशी रंगभूमीवर काम करीत असलेले हंगल यांना चित्रपटांमधून काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट जगतात यावे लागले. रंगभूमीशी जवळीक असणा-या हंगल यांनी अनेक नाटकं लिहून त्यामध्ये भूमिकाही केल्या आहेत. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी ते फार पूर्वीपासून जोडलेले होते.

कारकीर्द

हंगल यांचे लहानपण पेशावर येथे गेले. अभिनयाचा छंद त्यांना लहानपणा पासूनच होता. हंगल यांनी आपली अभिनय कारकीर्द वयाच्या ५० व्या वर्षी सुरू केली. वर्ष १९६६ मध्ये बासू भट्टाचार्य ह्यांच्या तिसरी कसम ह्या चित्रपटात ते प्रथम पडद्यावर दिसले. त्या नंतर मात्र त्यांनी एक उत्कृष्ट चरित्र अभिनेता अशी ख्याती मिळवली. त्यांची रामू काका ही भूमिका अतिशय प्रसिद्ध आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा मुलगा असूनही आपल्या विडीलाच्या इच्छे विरुद्ध त्यांनी शिप्याचे काम करण्याचे ठरवले. इंग्लंड येथे प्रशिक्षित एका शिंप्याकडून त्यांनी ५०० रुपये गुरुदक्षिणा देऊन शिवणकामाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. हंगल हे उत्तम शिंपी होते.

आत्मचरित्र

द लाइफ अ‍ॅण्ड टाइम ऑफ ए. के. हंगल हे त्यांचे आत्मचरित्र इंग्रजीत प्रसिद्ध झाले आहे.

पुरस्कार

त्यांना त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी भारत सरकारच्या पद्मभूषण या सन्मानानी इ.स. २००६ मध्ये गौरवण्यात आले.

प्रमुख चित्रपट

वर्षचित्रपटचरित्रटिप्पणी
१९८२श्रीमान श्रीमतीविश्वनाथ गुप्ता
१९८०हम पॉंचपंडित
१९८०फ़िर वही रातविश्वनाथ
१९८०जुदाईनारायण सिंह
१९८०काली घटादीवान
१९७९मीरासंत रईदास
१९७९खानदानमास्टरजी, ऊषा का पिता
१९७८देस परदेसपुजारी
१९७८नौकरीरंजीत का पिता
१९७८सत्यम शिवम सुन्दरमबंसी, रूपा का चाचा
१९७८बदलते रिश्तेप्रोफेसर
१९७८स्वर्ग नर्कगीता का पिता
१९७८तुम्हारे लियेभवानी
१९७८बेशरमरामचंद्र
१९७७मुक्तिकर्नल
१९७७आइनाराम शास्त्री
१९७७ईमान धर्ममास्टरजी, श्यामली का पिता
१९७७पहेलीमास्टरजी
१९७७कलाबाज़पुजारी
१९७७आलापपंडित जमुना प्रसाद (अतिथि पात्र)
१९७६ज़िन्दगीडॉक्टर
१९७६चितचोरपीतांबर चौधरी
१९७६बालिका बधूमास्टरजी
१९७६तपस्याचंद्रनाथ सिन्हा
१९७५ऑंधीबृंदा काका
१९७५शोलेइमाम साहब/रहीम चाचा
१९७५दीवारचंदर के पिता
१९७५अनोखाहृदयनाथ
१९७५सलाखेंरामलाल, सीमा का पिता
१९७४विदाईरामशरण
१९७४दूसरी सीता
१९७४कोरा कागज़प्रिंसिपल गुप्ता
१९७४आप की कसमकमल के पिता
१९७४इश्क इश्क इश्कगुरुजी
१९७३नमक हरामबिपिनलाल पांडे
१९७३जोशीलालाला गुलजारीलाल
१९७३अभिमानसदानंद
१९७३छुपा रुस्तमप्रोफ़ेसर हरबंसलाल
१९७३अनामिकाशिव प्रसाद
१९७३दागवकील/जज
१९७३हीरा पन्नादीवान करणसिंह
१९७२परिचयरवि का मामा
१९७२जवानी दिवानीकॉलेज प्राध्यापक
१९७२बावर्चीरामनाथ शर्मा (मुन्ना)
१९७१अनुभवहरी
१९७१नादानसीमा के पिता
१९७१मेरे अपनेकॉलेज प्राध्यापक
१९७१गुड्डीगुड्डी के पिता
१९६९सारा आकाशठाकुर
१९६९सात हिन्दुस्तानीडाक्टर
१९६७तीसरी कसम
१९६७शागिर्दकेदारनाथ बद्रीनारायण

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ए.के. हंगल चे पान (इंग्लिश मजकूर)