Jump to content

ऋषी कपूर

ऋषी कपूर
ऋषी कपूर
जन्मऋषी कपूर
४ सप्टेंबर, १९५२
मुंबई, मुंबई राज्य, भारत
(आता मुंबई, महाराष्ट्र, भारत)
मृत्यू ३० एप्रिल, २०२० (वय: ६७)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे चिंटू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ१९७० - २०१६
प्रमुख चित्रपट चांदनी आणि बॉबी
वडीलराज कपूर
पत्नीनीतू सिंग (१९७९)
अपत्येरणबीर कपूर

ऋषी कपूर ( ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. इसवी सनाच्या १९९० च्या व २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांच्या स्वरूपात बदल केला. 'कुछ तो है. या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नवीन) मध्ये रौफ लाला हा भीतिदायक वाटतो. औरंगजेब सिनेमातील त्याची भूमिका निर्दयी वाटते.30 एप्रिल २०२०रोजी त्यांचे निधन झाले आहे.

ऋषी कपूरची भूमिका असलेले चित्रपट (सुमारे १२०)

वर्षहिंदी चित्रपटभूमिकादिग्दर्शक
२०१६ सनम रे "डॅड्डु "
२०१५ ऑल  इस  वेल  भजनलाल भल्ला
वेडिंग  पुलाव लव्ह कपूर विनोद प्रधान
२०१४ बेवकूफीयां व्ही के सेहगल नूपुर अस्थाना
२०१३ डी-डे इक्बाल सेठ निखिल अडवाणी
२०१२ हाऊसफुल 2 चिंटू कपूर साजिद खान
२०११ पटियाला हाऊस गुरटेज सिंग कहोलाँ निखिल अडवाणी
२००९ दिल्ली-६ अली बेग रकीशी  ओमप्रकाश  मेहरा
चिंटू जी
लक बाय चान्स
२००८ हल्ला बोल
२००७ थोडा प्यार थोडा मॅजिक
डोन्ट स्टॉप ड्रीमिंग
नमस्ते लंडनमनमोहन मल्होत्रा
ओम शांति ओम
२००६लव के चक्कर में
फ़ना
२००५प्यार में ट्विस्टयश खुराना
२००४हम तुमअर्जुन कपूर
२००३तहज़ीब
कुछ तो हैप्रोफेसर बख़्शी
लव एट टाइम्स स्क्वैर
२००२ये है जलवा
२००१कुछ खट्टी कुछ मीठीराज खन्ना
२०००राजू चाचा
कारोबार
१९९९जय हिन्द
१९९७कौन सच्चा कौन झूठा
१९९६प्रेम ग्रंथ
दरार
१९९५हम दोनोंराजेश 'राजू'
साजन की बाहों मेंसागर
यारानाराज
१९९४ईना मीना डीकाईना
साजन का घरअमर खन्ना
प्रेम योगराजकुमार राजू
पहला पहला प्यारराज
मोहब्बत की आरज़ूराजा
घर की इज्जतश्याम
१९९३गुरुदेवइंस्पेक्टर देव कुमार
इज़्ज़त की रोटी
श्रीमान आशिक
साहिबॉंगोपी
साधनाकरन
दामिनीशेखर गुप्ता
१९९२दीवानारवि
बोल राधा बोलकिशन मल्होत्रा/टोनी
हनीमूनसूरज वर्मा
इन्तेहा प्यार कीरोहित शंकर वालिया
१९९१बंजारन
हिनाचन्दर प्रकाश
घर परिवार
अज़ूबा
रणभूमिभोलानाथ
१९९०अमीरी गरीबीदीपक भारद्वाज
शेषनाग
आज़ाद देश के गुलाम
१९८९खोजरवि कपूर
चॉंदनीरोहित गुप्ता
बड़े घर की बेटीगोपाल
हथियार
घरानाविजय मेहरा
१९८८हमारा खानदान
विजयविक्रम ए भारद्वाज
घर घर की कहानीराम धनराज
१९८७प्यार के काबिल
हवालातश्याम
सिंदूर
खुदगर्ज़
१९८६नगीनाराजीव
एक चादर मैली सीमंगल
नसीब अपना अपनाकिशन सिंह
दोस्ती दुश्मनी
१९८५राही बदल गये
तवायफ़
सागररवि
ज़मानारवि एस कुमार
सितमगरजय कुमार
१९८४ये इश्क नहीं आसां
दुनियारवि
१९८३कुलीसनी
१९८२दीदार-ए-यार
ये वादा रहाविक्रम राय बहादुर
प्रेम रोग
१९८१ज़माने को दिखाना हैरवि नन्दा
नसीबसनी
१९८०कर्ज़
दो प्रेमीचेतन प्रकाश
आप के दीवानेराम
धन दौलतलकी बड़जात्या सक्सेना
१९७९सरगमराजू
सलाम मेमसाबरमेश
झूठा कहीं काअजय राय
१९७८फूल खिले हैं गुलशन गुलशनविशाल राय
बदलते रिश्तेमनोहर धनी
पति पत्‍नी और वो
नया दौर
१९७७दूसरा आदमी
अमर अकबर एन्थोनीअकबर
चला मुरारी हीरो बनने
१९७६रंगीला रतन
लैला मज़नू
बारूदअनूप सक्सेना
कभी कभीविक्रम (विकी) खन्ना
१९७५रफ़ू चक्कर
राजा
१९७३बॉबीराज नाथ (राजू)
यादों की बारात
१९७०मेरा नाम जोकरकवि राजू

आत्मचरित्र

ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

ऋषी कपूरच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी

ऋषी कपूरसाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. या गाण्यांचे विविध सभागृहांत शोज होतात आणि त्या शोजना ऋषी कपूरची हजेरी असते, व त्यावेळी ते गाण्यांमागचे किस्से संगतात. २०१७ सालापर्यंत असे शोज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये, बंगलोरमध्ये आणि पुण्यात झाले आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ऋषी कपूर चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत