Jump to content

उस्मान खान (सतारवादक)

उस्मान खान (जन्म इ.स. १९४०) हे एक भारतीय सतारवादक आहेत. त्यांचेे पिता आणि गुरू धारवाड घराण्याचे सतारवादक उस्ताद अब्दुल करीम खान यांनी उस्मान खान यांच्या हातात बालपणीच सतार देऊन खूप सराव करून घेतला. उस्मान खान यांचे बंधू रहमत खान, शफीक खान आणि रफीक खान हेही सर्व सतारवादक आहेत.

उस्मान खान यांच्या फ्रान्स येथील शिष्या सिल्व्हिया फार्मिकोनी यांनी खान यांच्या सांगीतिक प्रवासावर 'जर्नी इन ड्रीम' हा माहितीपट तयार केला आहे.

उस्मान खान यांच्या शिष्यांनी २६ डिसेंबर २०१५ या दिवशी पुण्यात सतारवादनाचा जाहीर कार्यक्रम करून त्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला.