Jump to content

उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियम

उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियम

उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियम (कोरियन: 울산문수축구경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या उल्सान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००१ साली बांधुन पूर्ण झालेल्या व ४४,१०२ आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियममध्ये २००२ फिफा विश्वचषकामधील ३ सामने खेळवले गेले होते.

सध्या कोरियामधील के लीग मध्ये फुटबॉल खेळणारा उल्सान ह्युंडाई एफ.सी. हा क्लब ह्या स्टेडियमचा वापर करतो.

बाह्य दुवे