उर्बैन ली व्हेरिये
उर्बैन ली व्हेरिये (११ मार्च १८११, म्रुत्यु:२३ सप्टेंबर १८७७) हे एक फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते.ते खगोलीय यांत्रिकीमध्ये तज्ज्ञ होते.त्यांनी नेपच्यून या ग्रहाचे अस्तित्व व स्थिती हे केवळ गणिताद्वारे मांडली. युरेनसच्या भ्रमणकक्षेतील आणि केप्लर व न्यूटनचे नियम यांतील त्रुटी दाखविण्यासाठी त्यांनी बरीच आकडेमोड केली. त्यांनी केलेले गणित व आकडेमोड तपासण्यात आली असता, नेपच्यूनच्या अनुमानीत स्थितीत फक्त १ अंशाचा फरक पडला. हा शोध १९व्या शतकातील एक मोठी उपलब्धी मानल्या जाते व त्याद्वारे खगोलीय यांत्रिकीमध्ये नाट्यमय फरक घडला.