उम्मैद भवन पॅलेस
उमेद भवन पॅलेस हे भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूर शहरात जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान आहे. त्याच्या कांही भागात ताज हॉटेल आहे. याचे सध्याचे मालक गज सिंग यांचे आजोबा महाराजा उमेद सिंग यांचे नाव या पॅलेसला दिलेले आहे. या भव्य प्रसादात ३४७ खोल्या असून हे जोधपूर मधील गतकालीन राजकुटुंबाचे मुख्य निवासस्थान होते. या इमारतीच्या काही भागात त्याच घराण्याचे वस्तु संग्रहालय आहे.
ठिकाण
हा महाल मेहरांग किल्ल्यापासून ६.५ किमी तर जोधपूर विमानतळ आणि जोधपूर रेल्वे स्थानकापासून ४.५ किमी अंतरावर आहे.
इतिहास
एका साधुने शाप दिला होता की या राठोड राजकुळाला पुढील काळं चांगला येण्यासाठी अनाव्रष्टीला सामोरे जावे लागेल. या शाप वांनीतून निर्माण झालेला पॅलेस म्हणजे हा उमेद भवन पॅलेस ! पुढील ५० वर्षाचा काळं संपल्यानंतर राजा प्रताप सिंहच्या वेळी जोधपूर राज्य अतिशय कडक अनाव्रष्टीत सापडले आणि सन १९२० पासून पुढील सततची ३ वर्षे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. तेव्हा त्यावेळचा जोधपूरचा राजा उमेद सिंह याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पॅलेसचे निर्माण केले. राजा उमेद सिंह हे मारवाड प्रांताचे राठोड घराण्याचे ३७ सावे राजे होते. त्यांनी मानवता दृष्टीने या पॅलेसचे सढळ हस्ते बांधकाम खर्च केला आणि रोजगार निर्मिती करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
हेनरी वाघण लांचेस्टर या वास्तुविशारदाची या पॅलेसचे निर्मानासाठी आराखडा तयार करणेसाठी नेमणूक केली. न्यू दिल्ली येथील प्रशासकीय कॉम्प्लेक्सचे निर्माते सर एडविन लुत्येंस यांचे समकालीन हेनरी वाघण लांचेस्टर हे वास्तूशिल्पकार होते. यांनी त्या कॉम्प्लेक्सचा दृष्टिकोण समोर ठेवून आणि मनोरा पद्दत व कॉलमचा पुरस्कार केला. या पॅलसचा आराखडा तयार करताना भारतीय आदर्श वस्तूशिल्प आराखडे आणि त्यात विदेशी असामान्य तंत्रज्ञानाचा मिलाफ केला.
सन १९२९ मध्ये या वस्तूची पाया भरनी केली. साधारण स्थानिक २००० ते ३००० लोकांची या निर्मानासाठी नेमणूक केली. भारताचे स्वातंत्र्याचे नजीकचे काळातच म्हणजे सन १९४३ मध्ये महाराजांनी या पॅलेसचा ताबा घेतला. कांही लोकांचेकडून या वस्तूबाबात झालेले खूप खर्चाचे संबंधाने टीका झाली पण याचे निर्मांनाचे पाठीमागे मानवता दृष्टिकोण होता आणि जोधपूर वाशियांचे मदतीसाठी होता हे सर्वांनी ध्यानी घेतले. या पॅलेसचा नियोजित खर्च ११ मिल्लियन होता. सन १९४३ मध्ये या पॅलेसचे सोनेरी दरवाजे उघडले तेव्हा हा पॅलेस म्हणजे जगातील राजशाही थाटाचा सर्वात मोठा पॅलेस ठरला.
या पॅलेसचे जागेची निवड जोधपूरचे बाहेरील चित्तर टेकडीवरील केली होती. त्याने नातर त्याचे चित्तर पॅलेस हेच नाव झाले. तेथे पाण्याची सुविधा नव्हती आणि टेकडीचा उतार खडकाळ असल्याने तेथे झाडे झुडपे आणि भाजीपालाही होत न्हवता. वास्तु बाधकामासाठी आवश्यक असणारे दगड खानी इ. सामान अगदी जवळ नव्हते. बांधकाम सुलभतेने आणण्यासाठी महाराजाणे दगडाच्या खाणीपासून बांधकामाचे ठिकानापर्यंत रेल्वे लाइन केली. वाळू आणण्यासाठी गाढवांचा वापर केला. मोठ्या आकाराचे मार्बल ब्लॉक रेल्वे ने ठिकाणावर आणले आणि त्याने मोठी इमारत होण्यास मदत झाली.
या पॅलेसच्या दोन विंग सोनेरी व पिवळ्या रंगाच्या मार्बलने बनल्या. मकराणा मार्बलचा ही वापर केला, आणि बरमिस लाकडापासून आतील भाग शुशोभीत केला. जेव्हा वास्तु तयार झाली तेव्हा ३४७ खोल्या तयार होत्या, बरेचसे व्हरांडे, विस्तृत असे साधारण ३०० लोक सामावतील असे सभाग्रह. ही वास्तु वोगुए बीक्ष कला पद्दतीचे वास्तु शिल्प बनले. आणि ते इंडो- डेको म्हणून ओळखले जाऊ लागले. तरीसुद्दा पुढील बराच काळं या पॅलेस मध्ये राजघराण्यातील कांही शोकाकुल घटनेने चलन वलण बंद होते. या पॅलेस मध्ये उमेद सिंह फक्त ४ वर्षे राहिले आणि सन १९४७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लागोपाठ अगदी जवानीत असणारे हनुमंत सिंह, नुकतीच त्यांनी जनरल निवडणूक जिंकली होती आणि ते घरी परतत होते तेव्हा विमानाचा अपघात होऊन सन १९५२ मध्ये ठार झाले. गज सिंह II(द्वितीय) यांनी वडिलांकडचा कारभार स्वीकाराला आणि सन १९७१ मध्ये या पॅलेसचे परिवर्तन हॉटेल मध्ये केले.[१]
स्वरूप
या पॅलेसचे तीन भाग केले. राज घराण्याचे निवासस्थान,आरामदाई ताज पॅलेस हॉटेल आणि वीसव्या शतकापर्यंतचे जोधपूरचे राज घराण्याच्या इतिहासाचे संग्राहलय.
पॅलेस
हा पॅलेस २६ एकर जमिनीवर आहे. त्यातील १५ एकर जमिनीवर सुंदर बगीचा आहे. राजशाही सिंहासन हॉल, निव्वळ खाजगी स्वरूपाचे सभा ग्रह, सर्वसामान्याना भेटण्यासाठी दरबार हॉल, मेजवानीसाठी बांबुचा तात्पुरता मंडप, खाजगी भोजन ग्रह, नृत्य ग्रह, वाचनालय, पोहण्याचा तलाव, स्पा, बिल्लियर्ड्स रूम, ४ टेनिस कोर्ट्स, २ दुर्मिळ असी मार्बल स्क्वॉश कोर्ट्स, आणि विस्तीर्ण असे व्हरांडे.[२]
आतील मध्यभागाचा घुमट वरील निळ्या आकाशाखालील घुमटा खाली बसविलेला आहे. आतील घुमट हेच खरे आकर्षण आहे की ज्याची ऊंची १०३ फूट आहे तो बाहेरील ४३ फूट उंचीच्या घुमतात स्थानापन्न आहे. या पॅलेस मध्ये तुमचे स्वागत राठोड राज घराण्याच्या शाही कोट परिधान करून जोडलेल्या हातांनी होते. हॉलचे मध्ये तुमचे काळ्या रंगाच्या संगमरवरी दगडाने सुशोभित केलेल्या प्रवेश द्वारात तुमचे स्वागत होते. स्वयंपाक ग्रहात गुलाबी मऊ दगड आणि मार्बल बसविलेले आहेत. महाराजा गज सिंह की ज्यांना “बापजी” म्हणून ओळखले जाते, ते पॅलेसच्या एका विभागात राहातात.
हॉटेल
ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स मार्फत एका विंग मध्ये हे हॉटेल चालू आहे.[३] यात ७० अथिति खोल्या आहेत त्यात आर्ट डेको पद्दतीच्या आरामदाई “रीगल आणि वाइस रीगल सुट्स” आणि “महाराजा” व “महाराणी सुट्स” आहेत. बाथ टब गुलाबी रंगाच्या अखंड मार्बलचे तयार केलेले आहेत की असे भारतात कोठेही नाहीत. महाराणी सूट मध्ये सुंदर नक्षीकाम केलेले लाकडी फळ्या जमिनीवर बसविलेल्या आहेत आणि टेरेस वरुण बगीचा आणि इतर नैसर्गिक बाबींचा देखावा पहाता येतो. शयन खोलीला जोडूनच स्वयंपाक खोली आहे आणि त्या गुलाबी आणि बदामी रंग लावलेला आहे. शयन खोलीतील बेडची विशेषतः म्हणजे सिंहावर बसलेल्या स्त्रीची कलात्मक जोड दिलेली आहे. महाराजा सूट ढान्या वाघाचे कातडीसारखा सजविलेला आहे आणि जमिनीवर काळा मार्बल व काचेच्या टावदानाचा गोलाकार घुमट बनविला आहे. दोन्ही खोल्यांचे भिंतीवर नक्षीकाम करून त्या सजविलेल्या आहेत. बॅनक्वेट हॉलचे विस्तीर्ण रेस्टारंट बनविलेले आहे. सर्व खोल्यातून सेफ, टेलिफोन, दैनिक, वायफाय, रेफ्रीजरेतर, वातानुकूलित यंत्र, २४ तास स्वागत कक्ष, २४ तास चेक आऊट, बार, रेस्तरांत,जिम, पूल, व्यवसाय केंद्र,खोली सेवा, एलसीडी / प्रोजेक्टर, शॉपिंग, हेयर ड्रायर, वाहान तळं, धोबी, सलून इ. सुविधा आहेत.[४]
वस्तुसंग्रहालय
वस्तुसंग्रहालयात ढाण्या वाघाच्या गच्च भरल्या प्रतिक्रती,अतिशय मोठा असा राजघराण्याचे चिन्ह असलेला महाराजा जसवंत सिंह यांनी रानी विक्टोरिया यांना भेट म्हणून सन १८७७ मधील दिलेल्या झेंड्याची प्रतिक्रती, लक्ष वेधून घेणारी ‘quirky’ दिशादर्शक घड्याळे आणि लाइट हाऊस विविध आकार असणारे समान,आणि या पॅलेसचे आतील देखाव्याचे फोटोग्राफ्स आहेत. महाराज्यांच्या संचात असणाऱ्या उत्तम प्रतिच्या कार पॅलेसच्या बगीच्याच्या आवारात आहेत. काचेची भांडी, चीनी मातीची भांडी, इतर स्मरणात राहातील अशा वस्तु, आणि पॅलेस बाबतचा इतिहास दर्शनी भागातच आहे. दरबार हॉल हा एक वस्तुसंग्रहालयाचाच भाग आहे.[५] त्यात शोभिवंत नक्षीकाम, अनेक प्रकारची भरीव असी छोटी छोटी पेंटिंग्ज, चिलखत, असामान्य, दुर्मिळ असे त्या काळातील म्हणजे सन १९३० चे दरम्यानचे आणि की जे अतिशय महागडे व सध्या भारतात कोठेही उपलब्ध न होणारे घरगुती सामान ! हिवाळा ऋतू (साधारण ऑक्टोबर ते मार्च) या पॅलेसला व वस्तुसंग्रहालयाला भेट देन्यास उत्तम काळं आहे.
नुकतेच या उमेद भवन पॅलेस हॉटेलला "ट्रीप एडवायझर" या संघटनेकडून जगातील बेस्ट हॉटेल हा "ट्रवलर्स चॉइस अवॉर्ड" मिळालेला आहे.[६]
संदर्भ
- ^ "महाराजा गज सिंह(द्वितीय)यांनी पॅलेस चे परिवर्तन हॉटेल मध्ये केले".
- ^ "हॉटेल ताज उमेद भवन पॅलेसची आरामदायी सुविधा".
- ^ "उमेद भवन पॅलेस जोधपूर".
- ^ "उमेद भवन पॅलेस मध्ये राजेशाही आयुष्य जगा". 2016-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-07 रोजी पाहिले.
- ^ "उमेद भवन पॅलेस म्युझियम जोधपुर".
- ^ "उमेद भवन पॅलेस -जगातील सर्वोत्तम हॉटेल पुरस्कार २०१६".