उमा थर्मन
उमा थर्मन | |
---|---|
स्थानिक नाव | Uma Thurman |
जन्म | उमा करूना थर्मन २९ एप्रिल, १९७० बॉस्टन, मॅसेच्युसेट्स |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९८५ - चालू |
उमा करूना थर्मन (इंग्लिश: Uma Thurman; २९ एप्रिल १९७०) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी थर्मन १९९४ सालच्या क्वेंटिन टारान्टिनोच्या पल्प फिक्शन ह्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. २००३-०४ सालच्या किल बिल भाग १ व किल बिल भाग २ ह्या शृंखलेमध्ये आघाडीची भूमिका करून थर्मनच्या कारकिर्दीला संजीवनी मिळाली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उमा थर्मन चे पान (इंग्लिश मजकूर)