उमरेडचा किल्ला
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या उमरेड या तहसिलीच्या गावी असलेला हा किल्ला आहे. या गावात दगडी तटबंदीची वेस आहे. या किल्ल्याचा प्रकार स्थळदुर्ग आहे. लालसर पिवळ्या वालुकाश्मांनी ती बांधलेली आहे.या किल्ल्यास सात बुरुज आहेत. हत्ती अंबारीसह प्रवेश करु शकेल एवढे मोठे लाकडी प्रवेशद्वार होते. इ.स. १७व्या शतकात याचे बांधकाम झाले असावे. पुढे हा भोसले राजघराण्याच्या ताब्यात आला. याची फक्त तटबंदीच सध्या शिल्लक आहे. तेथे किल्ल्यासाठी वेगळी जलव्यवस्थाही होती. हा एक छोटा किल्ला होता.