Jump to content

उभयलैंगिकता

उभयलिंगी अभिमान ध्वज

उभयलैंगिकता म्हणजे नर व मादी दोघांप्रती, किंवा एकापेक्षा जास्त लिंगा प्रती असलेले प्रणयपुर्ण आकर्षण, लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक वर्तन. उभयलैंगिकता हा शब्द पुरुष आणि स्त्रिया दोघांबद्दलच्या प्रणयपुर्ण किंवा लैंगिक भावना दर्शविण्यासाठी, मुख्यतः मानवी आकर्षणाच्या संदर्भात वापरला जातो. ही संकल्पना लैंगिक प्रवृत्तीच्या तीन मुख्य वर्गीकरणांपैकी एक आहे जसे: विषमलैंगिकता आणी समलैंगिकता.

वैज्ञानिकांना लैंगिक प्रवृत्तीचे नेमके कारण माहित नाही, परंतु ते सिद्धांत सांगतात की हे अनुवांशिक, हार्मोनल आणि पर्यावरणीय प्रभावांच्या जटिल गुंतागुंतमुळे उद्भवले आहे, आणि ही एक निवड म्हणून त्या दृष्टीने पाहत नाहीत. लैंगिक अभिमुखतेच्या कारणास्तव अद्याप कोणत्याही एका सिद्धांताला व्यापक पाठिंबा मिळाला नाही, परंतु वैज्ञानिक जैविक दृष्ट्या आधारित सिद्धांतांना जास्त अनुकूल मानत आहेत.

उभयलैंगिकता विविध मानवी समाजात आणि इतरत्र प्राणी साम्राज्यात आढळली जाते. तथापि, उभयलिंगी हा शब्द, विषमलैंगिकता आणि समलैंगिकता या शब्दाप्रमाणेच १९व्या शतकात आला.

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असे नमूद करते की लैंगिक प्रवृत्ती सतत बदलत जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एखाद्याला केवळ समलैंगिक किंवा विषमलैंगिक असणे आवश्यक नसते, परंतु त्या दोघांचे वेगवेगळे अंश जाणवू शकतात. लैंगिक आवड एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात विकसित होते व वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात ज्याने त्यांच्या जीवनात असे मुद्दे दर्शवतात की ते भिन्नलिंगी, उभयलिंगी किंवा समलिंगी आहेत.

एक सामान्य समज आहे की प्रत्येकजण उभयलिंगी आहे (विशेषतः पुरुषांपेक्षा स्त्रिया), किंवा ती उभयलैंगिकता एक वेगळी ओळख म्हणुन अस्तित्वात नाही.

लोकसंख्याशास्त्र

उभयलिंगीपणासाठी लोकसंख्याशास्त्र अंदाज लावणाऱ्या अभ्यासाचे भिन्न परिणाम आहेत. १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या लैंगिक वर्तनावरील जॅनस अहवालात असे दिसून आले आहे की ५ टक्के पुरुष आणि ३ टक्के स्त्रिया स्वतःला उभयलिंगी मानतात आणि ४ टक्के पुरुष आणि २ टक्के स्त्रिया स्वतःला समलैंगिक मानतात. सर्व संस्कृतींमध्ये, उभयलिंगी वर्तनाच्या व्याप्तीत काही भिन्नता आढळते, परंतु समलैंगिक आकर्षणाच्या दरामध्ये बरेच भिन्नता असल्याचा कोणताही खात्री पटणारा पुरावा नाही.

समुदाय

इतर एलजीबीटी लैंगिकतेच्या लोकांप्रमाणेच, उभयलिंगी लोकांना बऱ्याचदा भेदभावाचा सामना करावा लागतो. होमोफोबियाशी संबंधित भेदभावाव्यतिरिक्त, उभयलिंगी लोकांना गेलेस्बियन समाजातील भेदभावांना सामोरे जावे लागते.

इतिहास

प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक लैंगिक संबंध चांगल्या परिभाषित शिक्क्यां सोबत जोडत नव्हते जसे आधुनिक पाश्चात्य समाज करतो. पुरुषांवर प्रेम करणारे पुरुष समलैंगिक म्हणून ओळखले जात नव्हते आणि कदाचित त्यांच्या बायका किंवा इतर महिला प्रेमी पण असत.

मीडिया

उभयलैंगिकता दाखवणारे अनेक चित्रपट आहेत जसे कि ब्रोकबॅक माउंटन (२००५), कॉल मी बाय युअर नेम (२०१७).

ॲंजेलिना जोली ही एक खुलेआम उभयलिंगी अमेरिकन अभिनेत्री आहे.[]

संदर्भ

  1. ^ Silverman, Stephen M. (July 9, 2003). "Angelina Jolie Airs Colorful Past on TV". People. April 7, 2015 रोजी पाहिले.