उपुल चंदना
उपुल चंदना ( ७ मे १९७२ , गॉल) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. प्रामुख्याने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या चंदनाने आपल्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी सामन्यांमध्ये ६१६ धावा व ३७ बळी तर १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,६२७ धावा व १५१ बळी नोंदवले.
चंदना २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील कोलकाता टायगर्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.
बाह्य दुवे
- खेळाडू माहिती: इ.एस.पी.एन.क्रिकइन्फो वरून