उपशास्त्रीय संगीत
उपशास्त्रीय संगीत हे शास्त्रीय संगीताचा बाज असलेले परंतु त्याचे सगळे नियम न पाळणारे संगीत आहे.
ठुमरी, दादरा, कजरी, सावनी, झूला, चैती, होरी, भजन हे सगळे गायनप्रकार उपशास्त्रीय संगीत प्रकारांमध्ये मोडतात.
चैती, होरी, कजरी, सावनी हे वेगवेगळ्या ऋतूंशी जुळलेले गानप्रकार आहेत. ह्यातील बरेचसे लक्ष्मी शंकर, गिरिजा देवी अश्विनी भिडे-देशपांडे, शोभा गुर्टू ह्यांनी गायले आहेत.