उपविभागीय अधिकारी
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपविभागीय अधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा.प्र.से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.
निवड
उपविभागीय अधिकारी यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) या संविधानिक आयोगामार्फत करण्यात येते.
नेमणूक
उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
- च्या दर्जाचे राज्य नागरी सेवा अधिकारी डेप्युटी कलेक्टर, उपविभागीय अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे.
- भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांना त्यांच्या परिवीक्षा कालावधीत उपविभागीय अधिकारी/ सहायक जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्त केले जाते.
उपविभागीय अधिकारी यांचे कार्य व जबाबदारी
- राज्य महसूल विभागाच्या उपजिल्हा/उपविभाग स्तरावर अधिकारी म्हणून काम करणे.
- उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
- उपविभागीय निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूकीचे कामकाज पाहणे.
- उपविभागातील एखाद्या प्रशासकीय धार्मिक ट्रस्टचे (सचिव) म्हणून कामकाज पाहणे.