उपवासाची मिसळ
साहित्य
- साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा)
- १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे
- काकडी किंवा कोशिंबीर
- खारे दाणे १ लहान वाटी
- साखर
- कोथिंबीर
- १ मोठी वाटी दही.
कृती
हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणाऱ्याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत. वरील पदार्थांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.