Jump to content

उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)

उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ) या पुस्तकात मराठी भाषेचे दैनंदिन व्यवहारात उपयोजन कसे होते आणि त्यातून रोजगारनिर्मिती कशी होते हे दाखविले आहे. डॉ.केतकी मोडक, संतोष शेणईसुजाता शेणई या संपादक-त्रयीने प्राध्यापक डॉ.गं.ना.जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुस्तक लिहिले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, व्यावसायिक या सर्वांना उपयुक्त ठरेल असे हे संदर्भसाहित्य आहे.

उपयोजित मराठी

(डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)


लेखकडॉ.केतकी मोडक, संतोष शेणई, सुजाता शेणई
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारअभ्यासपर लिखाण
प्रकाशन संस्थापद्मगंधा प्रकाशन
प्रथमावृत्ती१४ ऑगस्ट २०१२
मुखपृष्ठकारमहेश मोडक
पृष्ठसंख्या२४०
आय.एस.बी.एन.978-93-82161-18-9

पुस्तकाचा आशय

कार्यालयीन पत्रव्यवहार, नोकरीसाठी अर्जलेखन, गटचर्चा, इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, सारांश लेखन, टिपण्णी लेखन, लेखनविषयक नियम, ग्रंथपरीक्षण, परिभाषा, शोधनिबंध, कोशवाङ्मय, सूत्रसंचालन इत्यादी २५ विषयांवरील लेखन या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.

पुस्तकाचे वैशिष्ट्य

प्रा. रा. ग. जाधव, डॉ. सु. रा. चुनेकर यांसारख्या भाषेच्या ज्येष्ठ जाणकारांनी आणि सुधीर गाडगीळ, संदीप खरे, डॉ.भूषण केळकर यांसारख्या मान्यवर व्यावसायिकांनी अधिकारवाणीने मराठीच्या व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोजनाविषयी या पुस्तकात विचार मांडलेले आहेत.

मान्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या ग्रंथास संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आहे.[]

संदर्भ

  1. ^ "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रम २०१९" (PDF). unipune.ac.in.