Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा
four pillars with flame at their tops surrounding a single fifth pillar in the middle, also with flame at the top. The background is sky with mountain.
स्पर्धा

१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० • १९४४ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.

स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.

ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियास्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांची यादी

उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
आवृत्ती वर्ष यजमान तारखा देश खेळाडू स्पर्धा प्रकार संदर्भ
एकूण पुरूष महिला
I१८९६ ग्रीस अथेन्स, ग्रीस६–१५ एप्रिल 142412410943 [१]
II१९०० फ्रान्स पॅरिस, फ्रान्स१४ मे – २८ ऑक्टोबर 24997975221895 [२]
III१९०४ अमेरिका सेंट लुईस, अमेरिका१ जुलै – २३ नोव्हेंबर 1265164561791 [३]
IV१९०८ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम२७ एप्रिल – ३१ ऑक्टोबर 22200819713722110 [४]
V1912 स्वीडन स्टॉकहोम, स्वीडन१२ मे – २७ जुलै 28240723594814102 [५]
VI१९१६पहिल्या महायुद्धामुळे रद्द
VII१९२० बेल्जियम ॲंटवर्प, बेल्जियम२० एप्रिल – १२ सप्टेंबर 29262625616522154 [६]
VIII१९२४ फ्रान्स पॅरिस, फ्रान्स४ मे – २७ जुलै 443089295413517126 [७]
IX१९२८ नेदरलँड्स ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स१७ मे – १२ ऑगस्ट 462883260627714109 [८]
X१९३२ अमेरिका लॉस एंजेल्स, अमेरिका३० जुलै – १४ ऑगस्ट 371332120612614117 [९]
XI१९३६ नाझी जर्मनी बर्लिन, जर्मनी१–१६ ऑगस्ट 493963363233119129 [१०]
XII१९४०दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
XIII१९४४दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
XIV१९४८ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम२९ जुलै – १४ ऑगस्ट 594104371439017136 [११]
XV१९५२ फिनलंड हेलसिंकी, फिनलंड१९ जुलै – ३ ऑगस्ट 694955443651917149 [१२]
XVI१९५६ ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया२२ नोव्हेंबर – ९ डिसेंबर 723314293837617145 [१३]
XVII१९६० इटली रोम, इटली२५ ऑगस्ट – ११ सप्टेंबर 835338472761117150 [१४]
XVIII१९६४ जपान तोक्यो, जपान१०–२४ ऑक्टोबर 935151447367819163 [१५]
XIX१९६८ मेक्सिको मेक्सिको सिटी, मेक्सिको१२–२७ ऑक्टोबर 1125516473578118172 [१६]
XX१९७२ पश्चिम जर्मनी म्युनिक, पश्चिम जर्मनी२६ ऑगस्ट – ११ सप्टेंबर 12171346075105921195 [१७]
XXI१९७६ कॅनडा मॉंत्रियाल, कॅनडा१७ जुलै – १ ऑगस्ट 9260844824126021198 [१८]
XXII१९८० सोव्हियेत संघ मॉस्को, सोव्हिएत संघ१९ जुलै – ३ ऑगस्ट 8051794064111521203 [१९]
XXIII१९८४ अमेरिका लॉस एंजेल्स, अमेरिका२८ जुलै – १२ ऑगस्ट 14068295263156621221 [२०]
XXIV१९८८ दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरिया१७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर 16083916197219423237 [२१]
XXV१९९२ स्पेन बार्सिलोना, स्पेन२५ जुलै – ९ ऑगस्ट 16993566652270425257 [२२]
XXVI१९९६ अमेरिका अटलांटा, अमेरिका१९ जुलै – ४ ऑगस्ट 197103186806351226271 [२३]
XXVII२००० ऑस्ट्रेलिया सिडनी, ऑस्ट्रेलिया१५ सप्टेंबर – १ ऑक्टोबर 199106516582406928300 [२४]
XXVIII२००४ ग्रीस अथेन्स, ग्रीस१३–२९ ऑगस्ट 201106256296432928301 [२५]
XXIX२००८ चीन बीजिंग, चीन८–२४ ऑगस्ट 204109426305463728302 [२६]
XXX२०१२ युनायटेड किंग्डम लंडन, युनायटेड किंग्डम२७ जुलै – १२ ऑगस्ट भविष्य घटना
XXXI२०१६ ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल ५–२१ ऑगस्ट भविष्य घटना
XXXII२०२० जपान तोक्यो, जपानठरले नाही भविष्य घटना

खेळ

आजवर एकूण ४३ विविध खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भरवले गेले आहेत. २०१२मधील स्पर्धेत २६ खेळ खेळवले जातील.[]

खेळवर्षे
तिरंदाजी1900–1912, 1920, 1972-चालू
अ‍ॅथलेटिक्ससर्व
बॅडमिंटन1992-चालू
बेसबॉल1992–2008
बास्केटबॉल1936-चालू
बास्क पेलोटा1900
बॉक्सिंग1904, 1908, 1920-चालू
कनूइंग व कयाकिंग1936-चालू
क्रिकेट१९००
क्रॉकेट१९००
सायकलिंगसर्व
डायव्हिंग1904-चालू
इकेस्ट्रियन1900, 1912-चालू
तलवारबाजीसर्व
फुटबॉल1900–1928, 1936-चालू
गोल्फ1900, 1904, 2016, 2020
जिम्नॅस्टिक्ससर्व
हॅंडबॉल1936, 1972-चालू
हॉकी1908, 1920, 1928-चालू
ज्यू दे पॉम1908
ज्युदो1964, 1972-चालू
लॅक्रॉस1904, 1908
खेळवर्षे
मॉडर्न पेंटॅथलॉन1912-चालू
पोलो1900, 1908, 1920, 1924, 1936
रॅकेट्स1908
रोक1904
रोइंग1900-चालू
रग्बी युनियन1900, 1908, 1920, 1924
रग्बी सेव्हन्स2016
सेलिंग1900, 1908-चालू
नेमबाजी1896, 1900, 1908–1924, 1932-चालू
सॉफ्टबॉल1996–2008
जलतरणसर्व
सिंक्रोनाइज्ड जलतरण1984-चालू
टेबल टेनिस1988-चालू
ताईक्वांदो2000-चालू
टेनिस1896–1924, 1988-चालू
ट्रायथलॉन2000-चालू
टग ऑग वॉर1900–1920
व्हॉलीबॉल1964-चालू
Water motorsports1908
वॉटर पोलो1900, 1908-चालू
वेटलिफ्टिंग1896, 1904, 1920-चालू
कुस्ती1896, 1904-चालू

सर्वाधिक पदक विजेते देश

     भूतपूर्व राष्ट्रे

#देशस्पर्धासुवर्णरजतकांस्यएकूण
1 अमेरिका अमेरिका 259307286392297
2 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 93953192261010
3 जर्मनी जर्मनी 22247284320851
4 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 26207255203715
5 फ्रान्स फ्रान्स 26191212233636
6 इटली इटली 25191157174522
7 चीन चीन 8163117105385
8 हंगेरी हंगेरी 24159141159459
9 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 5153129127409
10 स्वीडन स्वीडन 25142160173475

संदर्भ

  1. ^ "Fewer sports for London Olympics". BBC Sport. British Broadcasting Corporation. 8 July 2005. 5 May 2006 रोजी पाहिले.

बाह्य दुवे