उत्तम गाडा
उत्तम रावजी गाडा (१ जुलै, इ.स. १९४८ - ) हे एक गुजराती-हिंदी नाटककार आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी २०हून अधिक नाटके लिहिली आहेत.
नाटके
- कार्ल मार्क्स इन काळबादेवी (गुजराती नाटक)
- डिअर फादर (रूपांतरित गुजराती नाटक, मूळ मराठी ‘काटकोन त्रिकोण’
- युगपुरुष (महात्मा गांधींच्या आध्यात्मिक गुरूंवरील नाटक. या नाटकाचे गुजराती-हिंदी व्यतिरिक्त मराठी-कन्नड भाषांतही प्रयोग होतात.
हिंदी पटकथा
- खिलाडी ४२०
- महारथी
- यूॅं होता तो क्या होता?
- व्हॉट्स्अप (दोन अंकी एकपात्री नाटक)
पुरस्कार
- खिलाडी ४२० च्या पटकथेसाठी ‘स्क्रीन’ अवॉर्ड (इ.स. २०००)