उज्ज्वला बर्वे
प्रा. उज्ज्वला बर्वे (माहेरच्या उज्ज्वला द्वारकानाथ लेले) या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांनी लहान मुलांसाठी सुमारे ५० वर्षे कथाकथनाचे कार्यक्रम केले होते. त्यांच्या आई प्रतिभा लेले या गोष्टी, गाणी लिहीत.
बर्वे यांनी काही इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची काही पुस्तके :
- ओझभूमीतील जादूगार (अनुवादित बालसाहित्य; मूळ इंग्रजी 'द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ', लेखक : लिमन फ्रॅंक ब्राउम)
- डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर)
- भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : अशोक पाध्ये)
- भारतीय माध्यम व्यवसाय (अनुवादित; मूळ इंग्रजी, द इंडियन मीडिया बिझिनेस, लेखिका : वनिता कोहली-खांडेकर)
- वारसा : प्रख्यात पालकांची त्यांच्या मुलींना पत्रे (अनुवादित; मूळ इंग्रजी 'लेगसी', लेखिका : सुधा मेनन)