Jump to content

ईस्टर्न एरलाइन्स

ईस्टर्न एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य ठाणे असलेली ही कंपनी १९२६मध्ये एडी रिकेनबाकरने स्थापन केली होती. या कंपनीने अमेरिकेच्या पूर्व भागातील विमानवाहतुकीवर वर्चस्व ठेवले होते. विशेषतः न्यू यॉर्क आणि फ्लोरिडादरम्यानच्या वाहतूकीवर १९५० च्या दशकापर्यंत ईस्टर्न एरलाइन्सचा जवळजवळ एकाधिकार होता व नंतरही या दोन ठिकाणांमधील बव्हंश वाहतूक ईस्टर्न एरलाइन्स करायची. १९८० च्या आसपासच्या काही वर्षांत या कंपनीचे नेतृत्व अंतराळवीर फ्रॅंक बोर्मनने केले. या काळात ईस्टर्न एरलाइन्समधील कामगारांनी केलेल्या चळवळीमुळे व संपामुळे, तसेच कर्जबोजा वाढल्याने कंपनी डबघाईला आली. १९८५मध्ये फ्रॅंक लॉरेंझोने ही कंपनी विकत घेऊन तिच्या बऱ्याचशा मालमत्ता कॉन्टिनेन्टल एरलाइन्स आणि टेक्सास एरकडे हस्तांतरित केल्या. १९८९मध्ये झालेल्या मोठ्या संपातून सावरता न आल्याने ईस्टर्न एरलाइन्सने १९९१मध्ये दिवाळे काढले.

या कंपनीचे हक्क असलेले बरेचसे मार्ग अमेरिकन एरलाइन्सला मिळाले तर तिची लॉकहीड एल-१०११ विमाने डेल्टा एर लाइन्सने घेतली.