ईस्ट इंडियन
मुंबईचे मूळ निवासी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | वांशिक समूह | ||
---|---|---|---|
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
धर्म | |||
| |||
पूर्व भारतीय कॅथलिक हे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत व रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड येथील मूळ निवासी आहेत. ईस्ट इंडियन्स हे पोर्तुगीजांच्या धर्म प्रचाराने प्रेरित आहेत, म्हणून त्यांच्या संस्कृतीत पोर्तुगीजाचांही थोडा प्रभाव आढळतो, परंतु त्यांनी आपली मराठी परंपरा व भाषा कायम ठेवली.[१]
इतिहास
पोर्तुगीज काळ
पोर्तुगीज हे इ.स. १४९८ मध्ये भारतात आले. तेव्हा त्यांनी आपल्या धोरणात भारतीय ख्रिस्ती लोकाना रोमन कॅथलिक संकल्पनेत आणायचे हे होते. तसे भारतात पोर्तुगीजांच्या आणि इंग्रजांच्या येण्याच्या ही अगोदरपासून ख्रिस्ती लोक होते. महाराष्ट्रातील हिंदू धर्मातून ख्रिस्ती झाले होते अशा ब्राह्मण, पाठारे प्रभु आणि दुसरे तथाकथित उंच जातीच्या लोकांना पोर्तुगीज खूप आदराने वागवत व त्यांना विशेष महत्त्व देत. पोर्तुगीजांनी तेव्हा जुने ख्रिस्ती आणि नवीन ख्रिस्ती यांना एकाच समुदायात जोडले. त्यांना पोर्तुगीज ख्रिस्ती म्हणुन संबोधण्यात आले. मराठ्याच्या पोर्तुगीजांवरच्या विजयानंतर पोर्तुगीज ख्रिस्ती लोकांमध्ये खूप बदल झाले, त्यांना मराठ्यांनी खूप सन्मानाने ठेवले. हा भाग मराठ्यांनी तेव्हा जिंकून घेतला. काही वर्षांनंतर हा भाग इंग्रजांच्या हाती गेला.
इंग्रज काळ
११ मे १६६१ रोजी इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा व पोर्तुगालची कॅथरीन ब्रॅगांझा याच्या विवाहादरम्यान मुंबई आणि सभोवतालचा भाग पोर्तुगीजांनी इंग्रजाना हुंडा म्हणून दिला. इंग्रजाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात ह्या भागामध्ये पोर्तुगीज ख्रिस्ती लोकांखेरीज दुसरे कोणतेही ख्रिस्ती नव्हते. ईस्ट इंडिया कंपनी मध्ये नोकरीत ह्याच ख्रिस्ती लोकांची मक्तेदारी होती त्या नोकरी साठी दुसरे ख्रिस्ती गोवा, मंगळूरमधून ह्या भागात येऊ लागले, त्या काळात त्यांनाही पोर्तुगीज ख्रिस्ती म्हणत. इंग्रजांना दोघांमध्ये फरक करणे कठीण झाले कारण मुंबईतले ख्रिस्ती हे इंग्रजाच्या शासनाधीन होते, आणि गोव्याचे ख्रिस्ती हे पोर्तुगीजांच्या शासनाधीन होते. व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्ण जयंती महोत्सवात मुंबईच्या ख्रिस्तीनी पोर्तुगीज ख्रिस्ती हे नाव सोडून ईस्ट इंडियन हे नाव स्वीकारले कारण त्याना ब्रिटिश शासनाला, स्थानिक मूळ निवासी म्हणून प्रभावित करायचे होते.
हे सुद्धा पहा
ईस्ट इंडियन वस्तीची प्रमुख ठिकाणे
ईस्ट इंडियन्स हे प्रामुख्याने माहीम, साष्टी बेट, माटुंगा, माझगाव, वांद्रे, विरार, वसई, असल्फा, घाटकोपर, किरोळगाव, हलावपूल, सफेदपूल, सहार आदी ठिकाणी आढळतात.
- ^ "मुंबईचे ईस्ट इंडियन कॅथोलिक". epaper.lokmat.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-11-22. २२ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)