Jump to content

ईला दा कुइमादा ग्रंज

ईला दा कुइमादा ग्रंज बेटाचे हवाई छायाचित्र

ईला दा कुइमादा ग्रंज (पोर्तुगीज: Ilha da Queimada Grande) हे ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागरातील बेट आहे. हे बेट स्नेक आयलंड म्हणजे सापांचे बेट म्हणूनही प्रसिद्ध आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो राज्याच्या इतन्याए महानगरपालिकेद्वारे त्याला प्रशासित केले जाते. लहान आकाराच्या या बेटाचे क्षेत्रफळ ४,३०,००० चौरस मीटर असून तिथे खडकाळपासून वर्षावनांचा भूप्रदेश आढळतो. हे बेट फक्त तिथेच आढळणाऱ्या गोल्डन लान्सहेड पिट व्हायपर या विषारी सापांचे घर आहे. या सापांचा मुख्य आहार तिथले पक्षी आहेत. हजारो वर्षांपूर्वी वाढत्या समुद्रपातळीमुळे या बेटाचा मुख्य भूमिशी संपर्क तुटला आणि हे साप त्या बेटावर अडकले. त्यामुळे सापांना या परिस्थितिशी जुळवून घ्यावे लागले आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे हे बेट लोकांसाठी धोकादायक झाले आहे. काही अंदाजांनुसार तिथे प्रत्येक चौरस मीटरमध्ये एक साप आहे असे म्हणले जात असे म्हणजे बेटावर एकूण ४,३०,००० साप असल्याचा अंदाज होता. अलिकडच्या काळात सापांच्या संख्येच्या पद्धतशीर अभ्यासानंतर बेटावर २०००-४००० साप असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आणि सर्व साप मुख्यत: बेटावरील वर्षावनात राहतात.[१][२][३]

या सापांचे संरक्षण करण्यासाठी हे बेट सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. या बेटावर जाण्यासाठी फक्त ब्राझीलचे नौदल आणि चिको मेंडेस इन्स्टिट्यूट ऑफ बायोडायव्हर्सिटी रिसर्च या संस्थेने मान्यता दिलेल्या निवडक संशोधकांना परवानगी आहे.[४][५][६]

संदर्भ

  1. ^ Martins, Marcio; Sawaya, Ricardo J.; Marques, Otavio A. V. (2008). "A First Estimate of the Population Size of the Critically Endangered Lancehead, Bothrops insularis". South American Journal of Herpetology. 3 (2): 168–174. doi:10.2994/1808-9798(2008)3[168:AFEOTP]2.0.CO;2. ISSN 1808-9798.
  2. ^ Marques, Otavio A. V.; Martins, Marcio; Develey, Pedro F.; Macarrão, Arthur; Sazima, Ivan (2012). "The golden lanceheadBothrops insularis(Serpentes: Viperidae) relies on two seasonally plentiful bird species visiting its island habitat". Journal of Natural History. 46 (13–14): 885–895. doi:10.1080/00222933.2011.654278. ISSN 0022-2933.
  3. ^ "ट्रेझर क्वेस्ट: स्नेक आयलंड फॅक्ट्स".
  4. ^ Marques, Otavio A. V.; Kasperoviczus, Karina; Almeida-Santos, Selma M. (2013). "Reproductive Ecology of the Threatened Pitviper Bothrops insularis from Queimada Grande Island, Southeast Brazil". Journal of Herpetology. 47 (3): 393–399. doi:10.1670/11-267. ISSN 0022-1511.
  5. ^ एमिली थॉमस. "ब्राझील्स 'स्नेक आयलंड' इज द प्लेस ऑफ नाईटमेअर्स, वी आर प्रेट्टी शुअर". Huff Post Science. October 24, 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Exposição traz história da ilha que abriga única espécie de cobra no mundo" (DOC) (पोर्तुगीज भाषेत). 2016-09-20 रोजी पाहिले.[permanent dead link]