ईमेल
ईमेल किंवा ई-मेल (मराठीत:विपत्र): हे electronic mail ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर(साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.
ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश लिहिलेला असतो.
प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया अॅटॅचमेन्ट्स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फायली पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात.
ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८०चा दशकात “अर्पानेट”चे इंटरनेट मध्ये झालेल्या रूपांतरामुळे ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.
संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला ई-मेल प्रथमत: “अर्पानेट” वर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP)चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून ईमेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होत असतो.
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा पुल्लिंगी शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टु ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
ईमेलचा उगम
हॉटमेल ही ईमेल प्रणाली सामान्य जनतेला फुकट वापरता येणारी पहिली यशस्वी ईमेल प्रणाली होती.
आधुनिक ईमेल यंत्रणा
इंटरनेटचा प्रभाव
इंटरनेट मुळे मोठ्या प्रमाणात फायदे तसेच तोटे झाले आहेत.
ईमेल शिष्टाचार (ईमेल एटिकेट्स)
== ईमेल व कॉंप्यूटर व्हायरसचा धोका ==gy)yh
स्पॅम ईमेल
स्पॅम ईमेल म्हणजे अनाहूतपणे पाठविलेले, बहुतांशी जाहिराती करण्यासाठी पाठवलेले ईमेल होत.
बाह्य दुवे
- ईमेल संवर्धन Archived 2011-07-18 at the Wayback Machine.
- › Ian Peter's History of the Internet ईमेल इतिहास
- अर्पानेट Archived 2007-01-13 at the Wayback Machine.
- फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल
== संदर्भ आणि नोंदी ==
- ^ "RFC 5321 – Simple Mail Transfer Protocol". Network Working Group. 19 January 2015 रोजी पाहिले.