इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - २८३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, इस्लामपूर मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील ताकारी, वाळवा, इस्लामपूर, आष्टा ही महसूल मंडळे आणि उरण इस्लामपूर नगरपालिका आणि आष्टा नगरपालिका क्षेत्र आणि मिरज तालुक्यातील कसबे दिग्रास महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. इस्लामपूर हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत राजाराम पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | जयंत राजाराम पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | जयंत राजाराम पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | जयंत राजाराम पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
इस्लामपूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
जयंत राजाराम पाटील | राष्ट्रवादी | १,१०,६७३ |
वैभव नागनाथ नाइकवाडी | अपक्ष | ५६,१६५ |
संजय कोले | स्वभाप | २,५३७ |
गौतम गुलाब लौटे | बसपा | १,९३१ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".