इसोरोकु यामामोतो
- हे जपानी नाव असून, आडनाव यामामोतो असे आहे.
इसोरोकु यामामोतो (जपानी भाषा: 山本 五十六, यामामोतो इसोरोकु) (एप्रिल ४, इ.स. १८८४ - एप्रिल १८, इ.स. १९४३) हा जपानचा दर्यासारंग होता. हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी आरमाराचा सरसेनापती तसेच नेव्हल मार्शल जनरल या पदांवर होता.
यामामोतो जपानच्या शाही आरमारी अकादमी तसेच हार्वर्ड विद्यापीठाचा (इ.स. १९१९-१९२१) विद्यार्थी होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस यामामोतो सरसेनापतीपदावर होता. याने पर्ल हार्बर आणि मिडवेच्या लढायांचे नियोजन केले होते. युद्धाच्या ऐनभरात अमेरिकेच्या गुप्तहेरांनी याच्या विमानाचा मार्ग अचूक हेरला व अमेरिकन वायुसेनेने हे विमान तोडून पाडले. यातच यामामोतोचा मृत्यू झाला.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- स्पार्टाकस एज्यूकेशनल - यामामोतोचे अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)
- कंबाइन्ड फ्लीट.कॉम - इसोरोकु यामामोतो (इंग्लिश मजकूर)