इसाबेला बीटन
इसाबेला मेरी बीटन (१२ मार्च १८३६ - फेब्रुवारी ६, इ.स. १८५०) ही एक इंग्लिश महिला पत्रकार, संपादक आणि लेखिका होती. 'मिसेस बीटन्स बुक ऑफ हाउसहोल्ड मॅनेजमेन्ट' या पुस्तकाने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणले. हे तिचे पहिले पुस्तक १८६१ साली प्रसिद्ध झाले. तिचे पती सॅम्युएल ओरचार्ट बीटन हे महत्त्वाकांक्षी प्रकाशक आणि संपादक होते.
इसाबेला मेरी बीटनचे पूर्वाश्रमीचे नाव मेसन असे होते. तिचा जन्म लंडन येथे झाला. प्राथमिक शिक्षण उत्तरी लंडनमधील इस्लिंगटन उपनगरात झाले आणि उच्च शिक्षण जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झाले.