Jump to content

इसवी सन

इसवी सन किंवा इसवी (लॅटिन: Anno Domini) ही ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. अरबी भाषेतील ’इसा’ (येशू) या शब्दापासून ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते.

इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या घटना काळ ’इसा पूर्व’, 'इसवी पूर्व' किंवा इ.स.पू. (इसवी सन पूर्व) असे म्हणतात.