Jump to content

इराण एर

इराण एर
आय.ए.टी.ए.
IR
आय.सी.ए.ओ.
IRA
कॉलसाईन
IRAN AIR
स्थापना १९४४ (इराण एरवेझ कंपनी)
हबतेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेमशहद
शिराझ
इस्फहान
ताब्रिझ
फ्रिक्वेंट फ्लायर फाल्कन फ्लायर
विमान संख्या ५१
गंतव्यस्थाने ६०
ब्रीदवाक्यOur Mission Is Your Safety
मुख्यालयतेहरान, इराण
मॉस्कोच्या शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघालेले इराण एरचे बोईंग ७४७ विमान

इराण एर - इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाची विमान कंपनी (फारसी: هواپیمايی جمهوری اسلامی ایران‎) ही इराण देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४४ साली स्थापन झालेल्या इराण एरचे मुख्यालय तेहरानच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ५१ विमाने आहेत. सध्या इराण एरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

१९७० च्या दशकात इराण एर झपट्याने प्रगती करणारी कंपनी होती. सुरक्षिततेच्या बाबतीत क्वांटास खालोखाल जगात तिचा दुसरा क्रमांक मानला जात असे. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर इराण एरमध्ये बरेच बदल घडून आले. २०१० सालापासून युरोपियन संघाने इराण एरच्या विमानांना आपल्या सदस्य देशांतील विमानतळांवर इंधन भरण्यावर बंदी घातली. अमेरिकेने इराणवर घातलेले आर्थिक निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण मानले जाते. ह्यामुळे इराण एरच्या विमानांना इंधन भरण्यासाठी इतरत्र वेगळा थांबा घ्यावा लागतो. आर्थिक निर्बंधांमुळे इराण एरला नवी विमाने विकत घेणे देखील अशक्य बनले असून सध्या तिच्या ताफ्यातील विमानांचे सरासरी वय २३ वर्षे आहे. असे असून देखील इराण एर जगातील सर्वात सुरक्षित विमानकंपन्यांपैकी एक मानली जाते.

बाह्य दुवे