इरा सिंघल
इरा सिंघल | |
---|---|
इरा सिंघल (२०१६) | |
जन्म | इरा सिंघल ३१ ऑगस्ट १९८३ मेरठ, भारत |
निवासस्थान | नवी दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | बी.टेक, एम.बी.ए. |
पेशा | भारतीय प्रशासकीय सेवा |
कारकिर्दीचा काळ | २०१६- सद्य |
मालक | भारत सरकार |
ख्याती |
|
पदवी हुद्दा | अतिरिक्त जिल्हाधिकारी, दिल्ली सरकार |
पुरस्कार | इंडिया टुडेच्या "वुमन ऑफ द इअर" |
इरा सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी आणि संगणक अभियंता आहेत. २०१४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी सर्वाधिक गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. सिंघल या त्यांच्या चौथ्या प्रयत्नात परीक्षेत अव्वल ठरल्या. तसेच या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत.[१][२][३]
जीवन
इरा सिंघल यांचा जन्म मेरठ येथील राजेंद्र सिंघल आणि अनिता सिंघल यांच्या घरी झाला. त्यांचे वडील अभियंता आहेत आणि आई विमा सल्लागार आहे. त्या मेरठच्या सोफिया गर्ल्स स्कूलमध्ये आणि लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल, दिल्ली येथील शीर्ष विद्यार्थीनी होत्या.
इरा यांना स्कोलियोसिस हा मणक्याशी संबंधित विकार आहे, ज्यामुळे त्या हाताच्या हालचाली व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यांनी आर्मी पब्लिक स्कूल, धौला कुआन येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट स्टडीज फॅकल्टीमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये दोनवेळा एमबीएची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली.
नागरी सेवा परीक्षेत एकूण २,०२५ पैकी १,०८२ गुण (५३.४३%) मिळवून त्यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला.[४][१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "Meet UPSC topper Ira Singhal, who fought disability and system to become an IAS officer". www.dnaindia.com. 2022-02-04 रोजी पाहिले.
- ^ "यहां पढ़ें यूपीएससी 2014 टॉपर इरा सिंघल की कहानी". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-02-04 रोजी पाहिले.
- ^ "Success Story: विकलांगता को मात देने वाली यूपीएससी टॉपर 'इरा सिंघल' लाखों लोगों के लिए हैं एक प्रेरणा". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-02-04 रोजी पाहिले.
- ^ "Barred from civil services earlier over 'disability', Ira Singhal tops UPSC". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-07-05. 2022-02-04 रोजी पाहिले.