Jump to content

इन्यो काउंटी (कॅलिफोर्निया)

बॅडवॉटर बेसिन हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ८५.५ मी खाली असून अमेरिकेतील सगळ्यात खोल ठिकाण आहे.

इन्यो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इंडिपेंडन्स येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,०१६ इतकी होती.[]

या काउंटीची रचना १८६६मध्ये झाली. या काउंटीला तिंबिशा भाषेतील इन्नियुन (ते धोकादायक आहे) या शब्दप्रयोगावरून दिलेले आहे.[]

अमेरिकेच्या ४८ राज्यांमधील सगळ्यात खोल ठिकाण बॅडवॉटर बेसिन (समुद्रसपाटीखाली ८५.५ मीटर) आणि सगळ्यात उंच ठिकाण माउंट व्हिटनी (समुद्रसपाटीच्या वर ४,४२१ मीटर) ही दोन्ही ठिकाणे इन्यो काउंटीत एकमेकांपासून फक्त १४५ किमी अंतरावर आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. मे 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जून 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Inyo County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ William Bright & John McLaughlin, "Inyo Redux", Names 48:147-150 (2000)