इन्फोसिस पुरस्कार
इन्फोसिस पुरस्कार हा इन्फोसिस फाउंडेशन द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंते व सामाजिक शास्त्रज्ञांना दिला जातो. वैज्ञानिक संशोधनास देण्यात येणारा हा भारतातील सर्वोच्च आर्थिक पुरस्कार आहे. या पुरस्कारात प्रामुख्याने सहा विभागांमध्ये दिले जातात. इंजिनियरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्सेस, मॅथेमॅटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस सोशल सायन्सेस आणि ह्युमॅनिटीज. या पारितोषिकात एक सुवर्ण पदक, एक प्रशस्तिपत्र, आणि इनाम रक्कम रु. ६५ लाख दिली जाते.