इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२
ईटी-ईएमएफ हे अपहरण झालेले विमान | |
| तारीख | १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ |
|---|---|
| स्थळ | सुदान |
| जखमी | ० |
| मृत्यू | ० |
| बचावले | २०२ |
| विमान प्रकार | बोईंग ७६७-३००ईआर |
| वाहतूक कंपनी | इथियोपियन एअरलाइन्स |
| विमानाचा शेपूटक्रमांक | ईटी-ईएमएफ |
| पासून | अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
| शेवट | मिलान माल्पेन्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२ हे १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ रोजी अदिस अबाबा पासून रोम मार्गे मिलानला जाणारे विमानोड्डाण होते. बोईंग ७६७-३००ईआर प्रकारच्या या विमानाचे हवेत अपहरण करून जिनीव्हा येथे नेण्यात आले. यातील सगळे २०२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप होते.