Jump to content

इजिप्त (रोमन प्रांत)

इ.स. १२५ च्या वेळचा इजिप्त प्रांत

इजिप्त (लॅटिन: Aegyptus एग्युप्टस, ग्रीक: Αἴγυπτος एग्युप्टॉस) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. रोमच्या पूर्व भागातील प्रांतांपैकी इजिप्त हा सर्वांत संपन्न प्रदेश होता व त्याची राजधानी अलेक्झांड्रिया हे साम्राज्यातील सर्वांत मोठे बंदर व रोमनंतरचे सर्वांत मोठे शहर होते.