Jump to content

इंद्राणी बालन फाउंडेशन

इंद्राणी बालन फाउंडेशन
कामाचे क्षेत्रआरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, ग्रामीण विकास
अध्यक्षपुनीत बालन
स्थापना२०१८
मुख्यालयपुणे

इंद्राणी बालन फाउंडेशन ही आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. पुनीत बालन हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. []

संस्थेचे कार्य

भारतीय लष्कराकडून चालवण्यात येणाऱ्या दहा शाळांची संपूर्ण जबाबदारी इंद्राणी बालन फाउंडेशनने घेतली आहे. काश्मीर मध्ये दहशतीखाली असलेल्या बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा अविरत विनामूल्य ज्ञानदानाचे कार्य करताहेत. सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष मुलांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेले डगर स्कूल भारतीय लष्करासमवेत बालन फाऊंडेशन चालवत आहे. [] [] [] [] []

१५० फूट उंच तिरंगा

काश्मिरमधल्या शोफियान मध्ये भारतीय लष्कराच्या साह्याने फाऊंडेशन ने १५० फूट उंच तिरंग्याचे अनावरण केले. []

सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर

फाऊंडेशनच्या माध्यमातून आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था परिसरात ८० हजार चौरस फुटांच्या जागेत 'श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर' प्रयोगशाळा बांधली,  या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्याने, विज्ञान प्रदर्शने असे उपक्रम राबवले जातात. [] []

संदर्भ

  1. ^ "Indrani Balan Foundation: Making a difference by supporting the aspirations of Kashmiri youth". ANI News (इंग्रजी भाषेत). 2023-04-19 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जम्मू-कश्मीर में आतंक प्रभावित परिवारों के बच्चों की शिक्षा को प्रायोजित करेगी इंद्राणी बालन फाउंडेशन". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2023-04-19 रोजी पाहिले.
  3. ^ News, K. I. "Indian Army signs MoU with Indrani Balan Foundation". Kashmir Images Newspaper (इंग्रजी भाषेत). 2023-04-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Army inaugurates school in Baramulla". risingkashmir.com. 2023-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-19 रोजी पाहिले.
  5. ^ Standard, Business (2023-03-17). "Will sponsor children's education in J&K: Indrani Balan Foundation". www.business-standard.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-19 रोजी पाहिले.
  6. ^ "'Dagger Parivaar School' inaugurated in Baramulla as a joint initiative by the Indian Army and the Indrani Balan Foundation". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-04-19 रोजी पाहिले.
  7. ^ "सावली झाली पायांखाली गडप (व्हिडिओ)". eSakal - Marathi Newspaper. 2023-04-19 रोजी पाहिले.
  8. ^ "स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्राची आयसर पुणेमध्ये स्थापना; चारशे शिक्षक, दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रशिक्षण". Loksatta. 2023-04-19 रोजी पाहिले.