Jump to content

इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र

पुणे म.न.पा.च्या इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र, राजेंद्र नगर, पुणे ३० येथे पर्यावरण जनजागृती विषयक कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येते. पर्यावरण कक्षामार्फत पुण्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण विषयक इंद्रधनु इको क्लब सुरू केला आहे. इंद्रधनू इको क्लब हे पुणे महानगरपालिकेने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व्हावे, त्याच सोबत विद्यार्थ्यांना व नागरिकांना पर्यावरण विषयक जागतिक व स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय घडामोडींचे आकलन व्हावे यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना शहरातील तसेच देशातील पर्यावरण संबधित समस्यांचे ज्ञान देण्यात येते. इंद्रधनू इको क्लब हा पुणे महानगरपालिकेने सामजिक जाणीवेने सुरू केलेला उपक्रम आहे व त्या अंतर्गत होणारे सर्व कार्यक्रम हे वर्षभर मोफत आयोजित करण्यात येतात.[]

फेब्रुवारी २०२० मध्ये पक्षी महोत्सव साजरा करण्यात आला.[]

संदर्भ

  1. ^ "पर्यावरण विभाग". https://www.pmc.gov.in. ०६-०२-२०२० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ "नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ३१ जानेवारीपासून पक्षी महोत्सव | eSakal". www.esakal.com. 2020-02-06 रोजी पाहिले.