Jump to content

इंदूर संस्थान

इंदूर संस्थान
इंदौर संस्थान
इ.स. १७३३इ.स. १९४८
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: प्राहोमेशोलभ्या श्रीः कर्तुः प्रारब्धान्
राजधानीइंदूर
सर्वात मोठे शहरइंदूर
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: मल्हारराव होळकर (प्रथम)(इ.स. १७३१-१७६६)
अंतिम राजा: यशवंतराव होळकर (द्वितीय) (इ.स. १९२६-१९४८)
इतर भाषामराठी, हिंदी
लोकसंख्या1,325,089 (१९३१)
–घनता53.9 प्रती चौरस किमी


इंदोरचा राजवाडा

इंदूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील सेन्ट्रल इंडिया एजन्सी मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाला होळकर संस्थान असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.

क्षेत्रफळ

इंदूर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.

राजधानी

या संस्थानाची राजधानी इंदूर या नगरात होती.

स्थापना

इंदूर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.

स्वातंत्र्योत्तर काळ

इंदूर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.